मुंबई : गृह विभागाने राज्यातील पोलीस दलात कार्यरत ६५ सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या केल्या. त्यात मुंबईतील नऊ सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश आहे.राज्यातील पोलिसांच्या बदल्यांचे सत्र सुरूच आहे. गृह विभागाने सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश गुरूवारी रात्री जारी केले. त्यात मुंबईतील सहाय्यक पोलीस आयुक्त रेणुका बागडे, शशिकांत भोसले, सचिन जायभाय, मनिषा रावखंडे, कुसुम वाघमारे, योगेश गावडे, भागवत सोनावणे, शैलेश सणस, प्रिया पाटील, तसेच पोलीस उपधीक्षक निलम व्हावळ आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

ठाण्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर, ममता डिसुझा, मिरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयातील दीपाली खन्ना, विजयकुमार मराठे आदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.सहाय्यक पोलीस आयुक्त तानाजी बर्डे (पुणे ग्रामीण), उत्तम कोळेकर (ठाणे) यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे.