या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेवर १८ तासांचा विशेष ब्लॉक, १०४ उपनगरीय सेवा रद्द

ब्रिटिशकालीन मुंबईतील महत्त्वाचा आणि १३५ वर्षे जुना हँकॉक पूल आता १० तारखेनंतर मुंबईच्या नकाशावरून पुसला जाणार आहे. डीसी-एसी परिवर्तनानंतर मध्य रेल्वेवर हा पूल तोडण्याची निकड भासल्याने मुंबई महापालिका आणि रेल्वे यांनी एकत्रितपणे हा पूल तोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा पूल पाडण्यासाठी शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान मध्य रेल्वेची भायखळ्यापुढील वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे अनेक मेल-एक्स्प्रेस गाडय़ांबरोबरच १०४हून अधिक उपनगरीय सेवा रद्द होणार आहेत. या ब्लॉकसाठी रेल्वे बोर्डाची परवानगी आवश्यक असून ही औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ब्लॉकदरम्यान भायखळ्यापुढे गाडय़ा येणे शक्य नसल्याने मेल एक्स्प्रेस गाडय़ा दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस ठाणे आणि पनवेल येथे थांबवून मागे वळवल्या जातील.  या ब्लॉकचा परिणाम हार्बर मार्गावर होणार नाही.े

इकडे लक्ष द्या

शनिवारी रात्री शेवटची उपनगरीय गाडी कर्जतकडे रवाना झाल्यावर पुलाचे पाडकाम सुरू होईल. यासाठी रात्री साडेबाराच्या सुमारास सुरू होणारा ब्लॉक रविवारी संध्याकाळी सहा-साडेसहापर्यंत चालणार आहे. त्यामुळे भायखळापुढील वाहतूक बंद राहणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hong kong bridge demolished on sunday
First published on: 07-01-2016 at 03:39 IST