देशभरातील गुणवंत विद्यार्थी ज्या संस्थेमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत असतात त्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या भारतातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेच्या पहिल्या प्रवेश फेरीमध्ये तब्बल ६५० जागा रिक्त राहिल्या आहेत.
देशभरातील १६ आयआयटीतील ९७११ जागांकरिता केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या प्रवेश फेरीत या जागांचे वाटप करण्यात आले. मात्र, यापैकी ६५० जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्याने त्या रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे, या जागा भरण्याकरिता दुसरी प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहे. नव्याने सुरू झालेल्या आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यास विद्यार्थी फारसे इच्छुक नसल्याने जागा रिक्त जात आहेत. गेल्या वर्षीही पहिल्या फेरीनंतर तब्बल ७६९ दागा रिक्त राहिल्या होत्या.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2014 रोजी प्रकाशित
पहिल्या फेरीनंतर ‘आयआयटी’च्या ६५० जागा रिक्त
देशभरातील गुणवंत विद्यार्थी ज्या संस्थेमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत असतात त्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या भारतातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेच्या पहिल्या प्रवेश फेरीमध्ये तब्बल ६५० जागा रिक्त राहिल्या आहेत.

First published on: 07-07-2014 at 03:49 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iits to go for second round of counselling 650 seats vacant