डोंबिवलीतील बलात्कार तसेच छेडछाडीच्या घटना ताज्या असतानाच घोडबंदर रोडवरील पातलीपाडा येथे रविवारी पतीदेखत विवाहितेचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आह़े
मुंब्रा भागात राहणारे एक दाम्पत्य मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घोडबंदर रोडने घरी परतत होते. फाऊंटन हॉटेल येथून ठाण्याच्या दिशेने येत असताना पातलीपाडा येथील उड्डाण पुलाजवळ एका कारचालकाने त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर कारमधील तिघांनी दुचाकीवरील २३ वर्षीय महिलेला दुचाकीवरून उतरवून तिचा विनयभंग केला व तेथून पळून गेले. महिलेच्या पतीने प्रसंगावधान राखत अल्टो कारचा क्रमांक नोंदवून घेतला़ त्या आधारे कासारवडवली पोलीस ठाण्यातील सा़ पो़ नि़़ शरद निरकूटे यांच्या पथकाने नरेश देविदास सुर्यवंशी (२३, रा़ पातलीपाडा), राजन रमेश निठारे (२८, रा़ वागळे इस्टेट), अतिश अशोक घोसाळकर (२८, रा़ वागळे इस्टेट) यांना अटक केली आह़े
संग्रहित लेख, दिनांक 25th Dec 2012 रोजी प्रकाशित
पतीदेखत महिलेचा घोडबंदर रोडवर विनयभंग
डोंबिवलीतील बलात्कार तसेच छेडछाडीच्या घटना ताज्या असतानाच घोडबंदर रोडवरील पातलीपाडा येथे रविवारी पतीदेखत विवाहितेचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आह़े मुंब्रा भागात राहणारे एक दाम्पत्य मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून घोडबंदर रोडने घरी परतत होते. फाऊंटन हॉटेल येथून ठाण्याच्या दिशेने येत असताना पातलीपाडा येथील उड्डाण पुलाजवळ एका कारचालकाने त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर कारमधील तिघांनी दुचाकीवरील २३ वर्षीय महिलेला
First published on: 25-12-2012 at 04:46 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In front of husband one men miss behave with his wife on kodbander road