मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी करून सातरस्ता येथील ४५ वर्षीय व्यक्तीकडून १५ लाख रुपये घेतल्याच्या आरोपाखाली मरिन ड्राईव्ह पोलिसांनी शनिवारी दोघांना अटक केली. आरोपींनी तक्रारदाराच्या सोसायटीचे काम करण्याच्या नावाखाली ही रक्कम घेतली होती. याप्रकरणी तक्रारीनंतर तोतयागिरी व फसवणूक केल्याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला होता. सुहास महाडिक (५०) व किरण पाटील (५०) अशी अटक आरोपींची नावे आहेत. महाडिक सातरस्ता परिसरातील रहिवासी आहे, तर पाटील हा टिटवाळा परिसरातील रहिवासी आहे. आरोपी सुहास महाडिक याच्याविरोधात यापूर्वी मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात मारहाण व धमकावल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल होता.

हेही वाचा : इन्स्टाग्राम मित्राला भेटण्यासाठी अल्पवयीन मुलगी नेपाळहून एकटीच आली; पण प्रियकराने मुंब्र्यात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारदार महेश कस्तुरी (४६) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते व्यवसायाने धोबी असून सातरस्ता येथील साईबाबा नगर येथील इमारतीत राहतात. धोबी घाट सोसायटीचे अध्यक्ष व निवडणुकीबाबत याचिका दाखल आहे. आरोपींनी कस्तुरी यांना किरण पाटील यांनी फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून सोसायटीच्या निवडणूक व अध्यक्षाबाबतचे रजिस्टार कार्यालयातील काम करण्यासाठी १५ लाख रुपये घेतले. त्यासाठी आरोपींनी नरिमन पॉईंट येथील एअर इंडिया इमारतीशेजारी असलेल्या खाद्यपदार्थांच्या दुकानाजवळ बोलावले होते. पण आरोपी यांनी फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक असल्याचा बनाव केल्याचे लक्षात आल्यानंतर कस्तुरी यांनी मरिन ड्राईव्ह पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी फसवणूक व तोतयागिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांनाही शनिवारी अटक केली. गुन्ह्यांतील १५ लाख रुपये अद्याप हस्तगत करण्यात आलेले नसून त्याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.