मुंबई– टिव्ही मालिकांमधून ओळख मिळवलेली अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ मधील एक स्पर्धक कशीश कपूर हिच्या घरातील साडेचार लाख रुपये घेऊन नोकर फरार झाला आहे. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिनेत्री कशीर कपूर (२४) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोडवरील न्यू अंबिवली सोसायटीत राहते. आरोपी सचिनकुमार चौधरी गेल्या पाच महिन्यांपासून तिच्या घरात काम करत होता. सकाळी तो घरात काम करण्यासाठी येत असे. कशीशच्या घरातील कपाटात खर्चासाठी पैसे ठेवलेले असत. तिने काही दिवसांपूर्वी घरात सात लाख रुपये ठेवले होते. मात्र तिला फक्त अडीच लाख रुपये दिसले. तिने याबाबत घरातील नोकर सचिन कुमार याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी तो घाबरला. तेव्हा कशिशने त्याचे पाकीट तपासायला मागितले. परंतु त्याने खिशातून ५० हजार रुपये काढून फेकले आणि पळून गेला. याप्रकऱणी अंबोली पोलीस ठाण्यात संशयित नोकर सचिन कुमार विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.