मुंबई : रेल्वे स्थानक, रेल्वे परिसर येथे हरविलेल्या, पळून आलेल्या, रस्ता चुकलेल्या ११६ मुलांना पुन्हा पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यात ७३ मुले आणि ४३ मुली यांचा समावेश असून मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ), त्यांचा शोध घेऊन त्यांना घरी सोडले आहे.

मध्य रेल्वेच्या आरपीएफदवर रेल्वे मालमत्ता, प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच लहान मुलांचा शोध घेण्यासाठी ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहीम सुरू आहे. कौटुंबिक समस्यांमुळे किंवा मुंबई शहराचे आकर्षण यांमुळे कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येतात. मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांना आढळल्यास ते मुलांशी संवाद साधतात. त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना समजावून पालकांकडे सोपवतात. १ एप्रिल २०२४ ते आतापर्यंत मुंबई विभागाने ११६ मुलांचा शोध घेण्यात यश आले आहे.

हेही वाचा : मुंबई: प्रकल्पबाधितांच्या घरांना मुलुंडकरांचा विरोध, रविवारी मुलुंडकरांनी केले आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एप्रिलमध्ये एकूण ५ मुले आणि १० मुली, मे महिन्यात २७ मुले आणि १० मुली, जूनमध्ये १६ मुले आणि ९ मुली, तर, २३ जुलैपर्यंत २५ मुले आणि १४ मुली यांचा समावेश आहे.