मुंबई : टोलच्या मुद्यावरून संपूर्ण राज्यात वातावरण तापलेले आहे, असे असतानाच मुंबईत टोलवरून झालेल्या वादातून चक्क एका आमदारालाच टॅक्सीचालकाने टॅक्सीतून खाली उतरवल्याची घटना घडली. एवढेच नाही, तर या खासगी टॅक्सीचालकाने आमदाराला हातपाय तोडून ठार मारण्याची धमकीही दिली. दरम्यान, आमदारांनाच खासजी टॅक्सी चालकांकडून अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य प्रवाशांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तक्रारदार आमदार राजू माणिकरावजी कारेमोर (५३) हे तुमसर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. कारेमोर बुधवारी सकाळी दिल्लीवरून मुंबई विमानतळावर आले. तेथून त्यांना आकाशवाणी आमदार निवासात जायचे होते.

हेही वाचा : म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीत पहिल्यांदाच टेरेस फ्लॅट, पिंपरीतील घरांची किंमत एक कोटी ११ लाख रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांनी विमानतळावरील टर्मिनस २ येथून ओला कंपनीच्या एका टॅक्सीची नोंदणी केली. कारेमोर टॅक्सीत बसले. त्यानंतर कारेमोर यांनी चालकाला आपण आमदार असल्याचे सांगितले. आमदारांना टोल माफ असल्यामुळे वांद्रे-वरळी सागरीसेतूवरील संबंधीत मार्गिकेवरून टॅक्सी घेऊन चल, असे त्यांनी चालकाला सांगितले. पण टॅक्सीचालक ऐकायला तयार नव्हता. अखेर त्याने आमदार कारेमोर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तुझ्याकडून टोल घेतला, तर मी तुला टोलचे पैसे देईल, असेही त्यांनी त्याला सांगितले. पण टॅक्सीचालक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्याने आमदार निवास येथे जाण्यास नकार दिला आणि कारेमोर यांना वाकोला जंक्शन येथे टॅक्सीतून खाली उतरवले. तसेच हात-पाय तोडून ठार मारण्याची धमकीही त्याने दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.