scorecardresearch

Premium

‘ई रक्तकोष’वरील अपुऱ्या नोंदीचा राज्याला फटका, सर्वाधिक रक्तसंकलनानंतरही देशपातळीवर नोंद नाही

राज्यातील सर्व जिल्हा रक्त संक्रमण अधिकाऱ्यांना ई- रक्तकोष संकेतस्थळावर नोंदी करण्याच्या सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून देण्यात आल्या आहेत.

Inadequate records
'ई रक्तकोष'वरील अपुऱ्या नोंदीचा राज्याला फटका, सर्वाधिक रक्तसंकलनानंतरही देशपातळीवर नोंद नाही (image – pexels/representational image)

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत देशात ‘आयुष्यमान भव’ या सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त देशातील सर्व राज्यांमध्ये आयोजित रक्तदान शिबिरे व रक्तसंकलनाच्या नोंदी केंद्र शासनाच्या ई – रक्तकोष संकेतस्थळावर करण्यात येत आहेत. मात्र महाराष्ट्रातील रक्त संकलनाच्या नोंदी अपुऱ्या असल्याचे दिसत असून त्यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक रक्त संकलन होऊनही देशपातळीवर त्याची नोंद घेतली जात नाही. ही बाब लक्षात घेता राज्यातील सर्व जिल्हा रक्त संक्रमण अधिकाऱ्यांना ई- रक्तकोष संकेतस्थळावर नोंदी करण्याच्या सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून देण्यात आल्या आहेत.

सेवा पंधरवड्यानिमित्त महाराष्ट्रात आयोजित रक्तदान शिबिरांमधून जवळपास ८० हजारांपेक्षा जास्त युनिट रक्त संकलन झाल्याचे महाएसबीटीसी या संकेतस्थळावर दिसून येत आहे. मात्र ई-रक्तकोषवर अंदाजे ३० हजार युनिट रक्त संकलन झाल्याची नोंद आहे. त्यानुसार या दोन्ही पोर्टलवरील नोंदीमध्ये अंदाजे ५० हजार रक्तसंकलनाच्या नोंदीची तफावत दिसून येते. त्यामुळे राज्यात उच्चतम रक्तदान होऊनही ई- रक्तकोष संकेतस्थळावर नोंद नसल्यामुळे देश पातळीवर या रक्तदानाची नोंद घेतली जात नाही.

29 villages dispute in Vasai-Virar
वसई-विरारमधील २९ गावांचा वाद : गावे समाविष्ट करण्याच्या नव्या निर्णयाला नव्याने आव्हान द्या, विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाची सूचना
Thackeray Group
“शेतकऱ्यांना चक्रव्यूहात ठेवून पंतप्रधान अलहान मोदीच्या आत्मनंदात”, शेतकरी आंदोलनावरून ठाकरे गटाची टीका
crime-news
पोलीस ठाण्याच्या दारातच बोकडाचा बळी; उदगीर पोलीस ठाण्यातील प्रकारानंतर कारवाईची मागणी
study group report recommended many benefits for maharashtra loom owners zws 70
राज्यातील यंत्रमागधारकांच्या प्रलंबित मागण्यांना अभ्यास समितीनकडून न्याय; अनेक चांगल्या शिफारशी 

हेही वाचा – ‘इंडिया’च्या ‘मी पण गांधी’ पदयात्रेला गालबोट, मुंबईत कार्यकर्ते-पोलिसांत धुमश्चक्री, अनेक नेते-पदाधिकारी ताब्यात

ही बाब लक्षात घेत सेवा पंधरवडा कालावधीतील सर्व रक्तदानाच्या नोंदी ई-रक्तकोष पोर्टलवर करणे सर्व रक्तकेंद्रांनी गांभीर्याने घेणे गरजेचे व अनिवार्य असल्याच्या सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक महेंद्र केंद्रे यांनी केल्या आहेत.

हेही वाचा – अभिनेता विवेक ओबेरॉयची दीड कोटींना फसवणूक, व्यावसायिक भागिदाराला अटक

रक्तकेंद्रांचा घेणार आढावा

शासकीय, निमशासकीय, खाजगी, रेडक्रॉस व धर्मादाय संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या रक्तकेंद्राचा आढावा जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी व विभागीय रक्त संक्रमण अधिकारी यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. यामध्ये सर्व प्रलंबित रक्तदान शिबिरांची व रक्तदानाची नोंद ई-रक्तकोष पोर्टलवर करून घेण्यात येणार आहे. तसेच या पंधरवाड्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या रक्तकेंद्रांचा राज्यस्तरावर सत्कार करण्यात येणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Inadequate records on e raktkosh hit the state mumbai print news ssb

First published on: 02-10-2023 at 17:44 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×