मुंबईत ३३ ठिकाणी शोधमोहीम

sanjay raut spoke offensive and derogatory manner about female candidate navneet rana says girish mahajan
संजय राऊतांबाबत बोलून आम्हाला…”, गिरीश महाजनांची टीका
women office bearers of Thackeray group in Kalyan join Shindes Shiv Sena
कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का, महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश
dharashiv, show of strength dharashiv
धाराशिवच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन
kalyan woman gudi making business marathi news,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी कल्याणची गुढी

मुंबई : शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या माजगाव येथील निवासस्थानी शुक्रवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. प्राप्तिकर विभागाचे अधिकारी जाधव यांच्या निवासस्थानी संध्याकाळी उशिरापर्यंत चौकशी करीत होते. या प्रकरणी मुंबईत ३३ ठिकाणी शोध मोहीम राबविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्रीय तपास यंत्रणेकडून महाविकास आघाडीतील मंत्र्याच्या चौकशीचे सत्र सुरू असल्याचा आरोप शिवसेनेकडून होत असताना शुक्रवारी जाधव यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर  विभागाने धाट टाकल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली.

शिवसेनेचे माझगावमधील नगरसेवक व स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सकाळी प्राप्तिकर  विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली असतानाच यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी प्राप्तिकर  विभागाने छापा टाकला. पालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित असून पालिकेतील शिवसेनेचा सर्वात मोठा नेताच चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यामुळे शिवसैनिकांमध्ये काळजीचे वातावरण पसरले आहे. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या दक्षिण मुंबईतील आमदार असून जाधव पती-पत्नी शिवसेना पक्षप्रमुखांच्या जवळचे मानले जातात. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमदार यामिनी जाधव यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाबाबत चुकीची माहिती दिल्याच्या आरोपावरून ही चौकशी सुरू झाल्याचे समजते. तपास सुरू असल्याने जाधव यांचे निवासस्थान असलेल्या इमारतीबाहेर मोठय़ा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

या प्रकरणाशी संबंधित ३३ ठिकाणी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. यापैकी पाच ठिकाणे कंत्राटदारांशी संबधित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष असल्याने स्थायी समितीमध्ये मंजूर होणाऱ्या सर्व आर्थिक निर्णयांमध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यातच गेले वर्षभर पालिकेतील भाजपच्या लोकप्रतिनिधीनी स्थायी समितीमध्ये मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचे आरोप वारंवार केले होते.