आपल्यापैकी प्रत्येकालाच अडचणींचा सामना करावा लागतो. अडचणींवर मात करत आयुष्यात नवी उंची गाठणाऱ्या व्यक्ती यशस्वी होतात आणि कित्येकांच्या प्रेरणा देखील बनतात. ऑटीजमसारख्या दुर्मिळ आजारावर मात करत जिया राय या १४ वर्षाच्या मुलीने राष्ट्रीय बाल पुरस्कारावर आपले नाव कोरले. गेले १० वर्ष जिया स्विमिंग करते आहे. तिने ओपन वॉटर पॅरा स्विमींग आणि ओपन वॉटर स्विमींगमध्ये जागतिक विक्रम देखील केले आहेत. चला तर मग असामान्य जियाच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.

१३-१४ वर्षांची मुलं सामान्यतः खेळतात, बागडतात नववी-दहावीच्या परीक्षांसाठी तयारीला लागतात. पण जिया मात्र या आजाराशी संघर्ष करत आहे. असे असताना देखील तिच्या आई-वडिलांनी हार न मानता जियाला सामाजिक प्रतिष्ठा कशी मिळेल यासाठी अथक परिश्रम घेतले. आता या मेहनतीचे चीज होत आहे. आपल्या या आजाराशी लढा देत सध्या जियाचा प्रवास पोहण्याच्या स्पर्धेत भारतासाठी पाहिलं-वहिलं पदक जिंकण्याच्या दिशेने सुरु आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोष्ट अ’सामान्यांची या मालिकेतील इतर भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.