मुंबई : इंडियन ओव्हरसीज बँकेशी संबंधित १८० कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याच्या प्रकरणात मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने फरारी आर्थिक गुन्हेगार उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या नावे अजामीनपात्र वॉरंट बजावले.

हेही वाचा – २,००० घरांसाठी लवकरच सोडत, पवईतील निर्माणाधीन ४२६, तर गोरेगावमधील ३३२ घरे

हेही वाचा – १९९३ च्या दंगलीतील आरोपीला ३१ वर्षांनंतर अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. नाईक निंबाळकर यांनी मल्याच्या नावे अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले. मल्ल्या फरारी आहे, ही स्थिती पाहता त्याच्या नावे अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात येत असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले. सीबीआयने या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेताना न्यायालयाने हा आदेश दिला. बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सच्या प्रवर्तकाने हेतुत: देयके चुकवून सरकारी बँकेचे १८० कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान केले, असा दावा सीबीआयचा आहे.