उद्योगपती गौतम अदानी बुधवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले होते. जवळपास एक तास दोघांमध्ये चर्चा सुरु होती. गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी ‘मातोश्री’वर जाऊन त्यांची भेट घेतली. या बैठकीचं कारण किंवा त्यांच्यात काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असताना झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Gautam Adani : जगातील अतिश्रीमंतांच्या यादीत गौतम अदाणी दुसऱ्या स्थानी, पुढे फक्त इलॉन मस्क

नुकताच, गौतम अदानी यांनी जगातील अतिश्रीमंतांच्या यादीत LVMH Moet Hennessy – Louis Vuitton चे सह-संस्थापक आणि अध्यक्ष बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकून दुसरे स्थान पटकावलं आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार गौतम अदानी हे आता जगतील दुसऱ्या क्रमांकाचे अतिश्रीमंत व्यक्ती आहेत. या यादीत त्यांच्या अगोदर आता केवळ इलॉन मस्क हेच आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रात सत्तांतर –

महाराष्ट्रात यावर्षी मोठी राजकीय घडामोड पहायला मिळाली आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आलं आहे. शिंदे गटाने बंडखोरी केल्याने अल्पमतात आलेल्या महाविकास आघाडी सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु असून, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आहे.