मुंबई : गेली अनेक वर्ष सातत्याने अपयशी ठरणारा राज्याचा गुप्तचर विभाग जालना येथील लाठीमार दुर्घटनेत पुन्हा एकदा अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी लाठीमार करण्यापूर्वी तीन दिवस हे आंदोलन सुरू झाले होते. त्यामुळे हे आंदोलन कोणते वळण घेऊ शकेल याचा अंदाज राज्याच्या गुप्तचर विभागाने राज्य सरकारला देण्याची गरज होती.या घटनेची चौकशी करण्यासाठी राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना जालनाला गेले आहेत. ते या गुप्तचर विभागाच्या अपयशाबद्दल चौकशी करणार आहेत.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दररोज सकाळी प्रत्येक क्षेत्रातील माहिती व तिचे विश्लेषण अहवाल सादर करण्याची जबाबदारी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तांची आहे. गेल्या वर्षी झालेल्या सत्तांतराची आगाऊ माहिती देखील सरकारला नव्हती. त्यामुळे हा विभाग दिवसेंदिवस अपयशी ठरत असल्याची चर्चा गृह विभागात सुरू आहे.

हेही वाचा >>>पोलिसांवर कारवाई, आंदोलकांना अभय; जालना लाठीमारप्रकरणी सरकारच्या वतीने माफी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील सर्व प्रकारच्या घडामोडींची इत्थंभूत माहिती राज्य गुप्तचर विभाग संकलित करून ती सरकापर्यंत पोहचवत असते. मुख्यमंत्र्यांना हा अहवाल दररोज सकाळी सादर केला जातो. तो पहावा की नाही याचा निर्णय मात्र मुख्यमंत्री घेत असतात. अशा प्रकारची गुप्तवार्ता संकलित करण्यासाठी या विभागाचे पोलीस साध्या वेशात गस्त घालतअसल्याचे दिसून आले आहे. मात्र मागील काही वर्षांत या विभागाला राज्यात घडणाऱ्या घटनांचा अंदाज बांधता येत नाही.