मुंबई : कांदिवलीमधील निर्मला महाविद्यालयात शिकणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा महाविद्यालयात मृत्यू झाला. अचानक रक्तदाब कमी झाल्याने ती महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच कोसळली होती. ही घटना गुरूवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हर्षिता पाल (२०) ही तरुणी  कांदिवलीच्या हनुमान नगरमध्ये रहात होती. ती कांदिवलीच्या निर्मला महाविद्यालयाच्या विद्यान शाखेच्या (बीएस्सी) आयटी विषयाच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. गुरूवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयात आली. मात्र प्रवेशद्वाराजवळच तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळळी. तिला त्वरित उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. रक्तदाबाची पातळी कमी झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हर्षिताला रक्तदाबाचा त्रास होता. यापूर्वी सुध्दा तिला दोन वेळा असा त्रास झाला होता. आम्ही तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्यानंतर नेमके कारण स्पष्ट होईल, असे समता नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे यांनी सांगितले. या घटनेमुळे महाविद्यालयात शोककळा पसरली आहे.

यापूर्वी १९ जून रोजी नालासोपारा येथे राहणाऱ्या संध्या पाठक (२१) या तरूणीने नैराश्यामुळे विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमी रक्तदाब धोकादायक

कमी रक्तदाब (९० च्या खाली) असलेले लोक सतत मृत्यूच्या धोक्यात नसतात, पण जर अचानक किंवा तीव्र स्वरूपात घसरण झाली तर तो जीवघेणा ठरू शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले.  कमी रक्तदाब (लो बीपी) म्हणजेच हायपोटेन्शन झाल्यास शरीरावर विविध प्रकारचे परिणाम होऊ शकतात. रक्तदाब खूपच कमी झाल्यास मेंदू, हृदय व इतर अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. शरीरातील रक्तदाब इतका कमी होतो. मेंदू, हृदय, मूत्रपिंड (किडनी) यांना रक्तपुरवठा थांबतो. लहान मुले, वृद्ध आणि अशक्तत लोकांमध्ये शरीरातील पाण्याचा व रक्तदाबाचा समतोल बिघडतो. अपघात, पचन संस्थेतील रक्तस्राव किंवा सर्जरीनंतर अचानक रक्तदाब घसरतो, आणि वेळीच उपचार न मिळाल्यास मृत्यू होऊ शकतो. रक्तदाब खूपच कमी झाल्यास हृदय काम करणे थांबवते, असे डॉक्टरांनी सांगितले.