कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यास निलंबित करण्यात आले आहे. पालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांनी हा कारवाई केली आहे. घरतला 35 लाख रुपयांची लाच घेताना गेल्या आठवड्यात पकडण्यात आले होते आणि त्याची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली होती. घरत याच्यासह लाच घेताना पकडलेल्या आणखी दोन जणांचं निलंबन करण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनियमित बांधकामाल संरक्षण देण्यासाठी एकूण 45 लाख रूपयांची लाच त्यानं मागितली होती त्यातली 35 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. गेल्या आठवड्यात 13 जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही कारवाई केली. पालिकेच्या मुख्यालयातच घरतला लाच घेताना अटक केल्याचे सांगण्यात येते. अनधिकृत बांधकामाविरूद्ध कारवाई करू नये म्हणून घरतने लाच मागितली होती. यातील पहिला हप्ता स्वीकारताना त्याला पकडण्यात आले आहे. मोठ्या पदावरील अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली होती. मात्र घरत याच्यावर लाचखोरीचे अनेक आरोप यापूर्वीही झाले होते, मात्र त्याच्यावर राजकीय वरदहस्त असल्याने कारवाई होत नाही असेही सांगण्यात येत होते.

काही दिवसांपूर्वी त्याच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याच्याकडे असलेल्या संपत्तीवरून एसीबीकडून चौकशीही करण्यात आली होती. पालिकेच्या निवडणुकीदरम्यान शिवीगाळ, इंजिन घोटाळा, परिवहन घोटाळा, डिझेल फिल्टर घोटाळा आदी प्रकरणांमध्येही त्याचे नाव चर्चेत आले होते. घरत हे कल्याण डोंबिवली महापालिकेतील जुने अधिकारी समजले जातात. अनेक नगरसेवक घरत यांना वचकून असत. तसेच, प्रत्येक आयुक्तांची अडवणूक करणे, नको त्या प्रकल्पांना कीळ घालणे, आपल्याला हव्या त्या प्रकल्पांनाच मदत करणे अशा अनेक प्रकारच्या मनमानी कारभाराचे आरोपही घरत यांच्यावर होते. मात्र, केवळ राजकीय वरद हस्त असल्यामुळेच ते सहीसलामत वाचत असल्याची वदंता होती. मात्र आता त्याला तडा बसला असून घरतला लाच घेताना केवळ अटकच झालेली नाही तर आता त्याला कल्याण डोंबिवली महापालिकेतून निलंबितही करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kdmc additional commissioner sanjay gharat suspended
First published on: 19-06-2018 at 14:03 IST