कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी कोकण रेल्वेने ‘श्रावण सेवा’ सुरू केली. यात रेल्वे गाडीच्या डब्यात सामान घेऊन चढताना तसेच उतरताना ज्येष्ठ नागरिकांना मदतनीस मदत करणार आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळेल, असा दावा कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्याने केला आहे.
लांब पल्ल्यांच्या गाडय़ांनी प्रवास करताना जड सामान घेऊन डब्यात शिरताना किंवा उतरताना ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यावर तोडगा काढत कोकण रेल्वेने ही सेवा सुरू केली आहे. यात कोकण रेल्वेने प्रवास करताना प्रवास सुरू होण्याआगोदर एका तासापूर्वी पीएनआर क्रमांक,भ्रमणध्वनी क्रमांक आणि आसन क्रमांक आदींची माहिती ९६६-४०४-४४५६ या क्रमांकावर पाठवायची आहे. ही सेवा मोफत असून सध्या चिपळूण, रत्नागिरी, शिवीम, करमाळी आणि मडगाव आदीं स्थानकांमध्ये उपलब्ध असल्याचे कोकण रेल्वेतर्फे सांगण्यात आले. ‘श्रावण सेवा’ योजनेचा आजपर्यंत दीड हजारापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Dec 2015 रोजी प्रकाशित
ज्येष्ठ नागरिकांसाठी कोकण रेल्वेत ‘श्रावणबाळ’
रेल्वे गाडीच्या डब्यात सामान घेऊन चढताना तसेच उतरताना ज्येष्ठ नागरिकांना मदतनीस मदत करणार आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 29-12-2015 at 05:33 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Konkan railway introduces shravan seva scheme for senior citizen