अनिश पाटील

चीनमधून भारतात आणण्यात आलेला कुख्यात गुंड सुभाष विठ्ठल पुजारी ऊर्फ प्रसाद पुजारी हा पूर्वी कुमार पिल्ले व छोटा राजन टोळीसाठी काम करायचा. त्यांच्याशी मतभेदानंतर स्वत:ची टोळी बनवली होती. सुभाष विठ्ठल पुजारी ऊर्फ प्रसाद पुजारी विरोधात १५ ते २० खंडणीचे गुन्हे मुंबई व परिसरात दाखल आहेत. पुजारीला हाँगकाँगमध्ये इंटरपोलच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले आहे. प्रसाद पुजारी २०१० पासून सुरक्षा यंत्रणांचा ससेमिरा चुकवून पळत आहे. तत्कालीन शिवसेना उपविभाग प्रमुख यांच्यावरही प्रसाद पुजारीने हल्ला घडवून आणला होता.

Argument in Bar in 2016 BJP MLA Krishna Khopdes son had surrendered
बारमध्ये वाद : नागपूर भाजपच्या ‘या’ आमदाराच्या पुत्राने केले होते आत्मसमर्पण
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Rajendra Raut, Manoj Jarange patil ,
मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून आघाडीला सत्तेत आणण्याचा डाव, आमदार राजेंद्र राऊत यांचा पुन्हा हल्ला
Jarange agitation, Mahavikas Aghadi,
जरांगे यांचे आंदोलन महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी – राजेंद्र राऊत
fresh attack in manipur
Manipur Violence : वृद्ध नागरिकाच्या हत्येनंतर मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची घटना; दोन सशस्र गटातील गोळीबारात पाच जणांचा मृत्यू
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?
Prime Minister Narendra Modi assertion of support for developmental policy in Brunei
विकासात्मक धोरणाला पाठिंबा; ब्रुनेई येथील भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
Jagdish Tytler indicted after 40 years in anti-Sikh riots case
शीखविरोधी दंगलप्रकरणी जगदीश टायटलर यांच्यावर ४० वर्षांनी दोषारोप… काय होते प्रकरण?

पूर्व उपनगरात सक्रिय असणाऱ्या पुजारीला मार्च २००८ मध्ये चीनमध्ये तात्पुरता निवास व्हिसा मिळाला होता, त्याची मुदत मार्च २०१२ मध्ये संपली. त्यानंतर त्याने तेथे चिनी महिलेशी लग्न केले. त्याची पत्नी शेनझेनसह विमान प्रवास करत असताना इंटरपोलने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याला हाँगकाँगमध्ये ताब्यात घेण्यात आले. पुजारी चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील शेनझेन शहरात राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या दोघांना चार वर्षांचा मुलगा असल्याचे त्यांनी सांगितले. हाँगकाँगमधून त्याला भारतात प्रत्यार्पण करणे कठीण बाब आहे. पुजारीवर मुंबई आणि ठाण्यात खंडणीचे सुमारे १५ ते २० गुन्हे, एक हत्या आणि खुनाच्या प्रयत्नाचे तीन गुन्हे दाखल आहेत. रवी पुजारीनंतर तो मुंबईतील पूर्व उपनगरात, ठाण्यात सक्रिय होता. संघटित टोळी तयार करून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली गुन्हे शाखेने त्याच्या आईला अटक केल्यानंतर त्यांच्या कारवाया थंडावल्या.

हेही वाचा >>> ६३० कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची विकासकांकडूनही खरेदी!

दहशत निर्माण करण्यासाठी डिसेंबर २०२१ मध्ये त्याने विक्रोळीतील तत्कालीन उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्याप्रकरणी गुन्हे शाखेने सहा जणांना अटक केली होती. या गोळीबार प्रकरणात पुजारीच्या आईचा सहभागही तपासादरम्यान उघड झाला होता. या हल्ल्यात शेखर जाधव सुदैवाने वाचले होते. त्यापूर्वी पुजारीने २०१८ मध्ये एक कोटीची खंडणी पूर्व उपनगरातील बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली होती. पण त्या वेळी संबंधित बांधकाम पाडण्यात आल्याचे कारण देत व्यावसायिकाने वेळ मारून नेली. त्यानंतरही पुजारी त्याला वारंवार आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून दूरध्वनी करून धमकावत होता. अखेर, बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हा तपास खंडणीविरोधी पथकाकडे देण्यात आला. त्यांनी सापळा रचून पुजारीचा हस्तक आंगणे याला विक्रोळीतील टागोरनगर येथून अटक केली. या बांधकाम व्यावसायिकाला धमकावण्यासाठी प्रसाद पुजारीने व्हॉट्स अॅपद्वारे एक संदेश पाठवला होता. त्यात जाधव यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याचा दाखला देत ‘विक्रोली में एक को चॉकलेट दिया, पैसा ढिला कर!’ अशा शब्दांत धमकावून एक कोटीची खंडणी मागितली होती. प्रसाद पुजारी खंडणीसाठी अद्यायावत अॅप्लिकेशनचा वापर करायचा. व्हॉट्स अॅपद्वारे दूरध्वनी केल्यास आपण सुरक्षा यंत्रणांच्या नजरेत येऊ शकतो ही भीती असल्याने आरोपी आंगणे याने बांधकाम व्यावसायिकाशी संवाद साधण्यासाठी गुंड पुजारीला ‘बोटीम अॅप’वरून कॉल केला होता. त्यामुळे त्याच्या दूरध्वनीचे ठिकाण सुरक्षा यंत्रणांना मिळाले नव्हते. या काळात पुजारीविरोधात सुमारे ५ ते ७ खंडणीचे गुन्हे दाखल झाले होते. गोळीबाराची धमकी देऊन पुजारी पूर्व उपनगरे व ठाण्यातील व्यावसायिकांना धमकावत होता. त्यामुळे मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा त्याच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होती. खबऱ्यांचे जाळे व तंत्रज्ञानाच्या मदतीने पुजारीच्या ठिकाणाची माहिती मिळवण्यात आली. तंत्रज्ञानाच्या मदतीने तो चीन व हाँगकाँगमध्ये सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले होते. ती माहिती व पुरावे पुढे इंटरपोलला सुपूर्द करण्यात आले. चीनच्या इतर परिसरात त्याला पकडणे शक्य नसल्यामुळे हाँगकाँगमध्ये पुजारी येण्याची वाट पाहून मोठ्या शिताफीने स्थानिक यंत्रणांकडून त्याला २०२३ मध्ये ताब्यात घेण्यात आले. अखेर २३ मार्चला त्याला भारतात आणण्यात आले.