मुंबई : देशातील २५ विकासकांनी एकूण ६३० कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांची खरेदी केली आहे. यामध्ये मुंबईतील बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणाऱ्या कल्पतरु, रुस्तमजी, बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन, के. रहेजा, ओमकार, बीकेसी प्रॉपर्टीज आदी विकासकांची नावे या यादीत आहेत. मुंबईत बांधकाम क्षेत्रात जम बसवू पाहणाऱ्या डीएलएफचाही त्यात समावेश आहे.

निवडणूक आयोगाने संकेतस्थळावर जाहीर केलेल्या माहितीनुसार, निवडणूक रोखे खरेदी करण्यात देशातील २५ बडे विकासक आघाडीवर असून त्यांनी ६३० कोटी रुपयांचे रोखे खरेदी केली आहे. त्यापैकी ३१४ कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला मिळाले आहेत. त्याखालोखाल काँग्रेस (९८ कोटी), भारत राष्ट्र समिती (९० कोटी), शिवसेना (८७ कोटी), ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (४१ कोटी) या पक्षांचा समावेश आहे. 

raver lok sabha seat, Raksha Khadse increase in assets, Eknath Khadse s loan of 23 lakhs on Raksha Khadse, seven and a half crores, marathi news, lok sabha 2024, raver lok sabha 2024,
रक्षा खडसे यांच्यावर एकनाथ खडसे यांचे २३ लाखांचे कर्ज, मालमत्तेत साडेसात कोटींनी वाढ
Sunetra Pawar campaign started at Maruti Mandir in Kanheri in Baramati.
विकास त्यांनीच केला काय? बारामतीमधील कामांवरून अजित पवार यांचा सवाल; शरद पवार यांच्यावर टीका
Aslam shah
उमेदवारी अर्जासाठी १० हजारांची चिल्लर; नाणी मोजताना अधिकाऱ्यांना एसीतही फुटला घाम, मोजणी संपल्यानंतर…
Suresh Khade
सांगली : आंदोलनकर्त्या कामगारांना मंत्र्यांच्या मध्यस्थीने २०० कोटींची भरपाई

हेही वाचा – मुंबईतील अपंगस्नेही पदपथांचे प्रकरण : कायद्यांची पुस्तके कपाटात रचण्यासाठी आहेत का ? उच्च न्यायालयाचे खडेबोल

डीएलएफ समूह आणि डीएलएफ कमर्शिअल डेव्हलपर्स लि., डीएलएफ लक्झरी होम्स लि., डीएलएफ गार्डन सिटी इंदौर या उपकंपन्यांनी २०१९ ते २०२३ या काळात सर्वाधिक म्हणजे १८० कोटी रुपये भाजपला निवडणूक रोख्यांच्या स्वरुपात उपलब्ध करून दिले आहेत. बंगळुरू येथील प्रेस्टिज समूहही सध्या मुंबईतही बांधकाम व्यवसायात सक्रिय झाला असून त्यांनी ऑक्टोबर २०१९ ते एप्रिल २०२३ या काळात भाजप, काँग्रेस आणि भारत राष्ट्र समिती अशी ४५ कोटींची रोखे खरेदी केल्याचे आढळून येते. मुंबईत मुख्यालय असलेल्या के रहेजा कॉर्प प्रा. लि.ने भाजप, शिवसेना आणि भारत राष्ट्र समितीला २१ कोटी रुपये रोखे स्वरुपात दिले आहेत. प्रामुख्याने व्यावसायिक मालमत्ता उभारणाऱ्या लुलू तसेच इनऑर्बिट मॉल्स इंडिया यांनीही निवडणूक रोख्यांद्वारे भाजप, काँग्रेस तसेच भारत राष्ट्र समितीला मदत केली आहे. बी. जी. शिर्के कंपनीने प्रामुख्याने भाजप, काँग्रेस, शिवसेनेसोबत आपसाठीही निवडणूक रोख्यांची खरेदी केल्याचे दिसून येते. शिवसेनेला मिळालेल्या निवडणूक रोख्यापैकी बी. जी. शिर्के कंपनीचा वाटा लक्षणीय असल्याचे दिसून येते.

हेही वाचा – ११ हजार ‘निक्षय मित्रां’नी १९ हजार क्षयरोग रुग्णांना घेतले दत्तक, दोन वर्षांत ८८ हजार पोषण किट केले उपलब्ध

निवडणूक रोखे खरेदी करणारे विकासक : (सर्व कोटींमध्ये) 

कीस्टोन रिअल्टर्स (रुस्तमजी समूह) : ४.८, ओमकार रिअल्टर्स प्रोजेक्ट : ४.५, पेगॅसस प्रॅापर्टीज : १९, के रहेजा कॅार्प : २१, बागडोरा रिअल्टर्स : १, बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन : ११२, प्रेस्टिज समूह आणि उपकंपन्या : ४५, डीएलएफ समूह आणि उपकंपन्या : १८०, ॲम्बी कन्स्ट्रक्शन : १०, चेन्नई ग्रीन वूड्स : १०५, बीकेसी प्रॉपर्टिज : २०, पाम शेल्टर इस्टेट डेव्हलपमेंट : १२, रघुकुल इस्टेट डेव्हलपमेंट : ९, लुलू इंडिया शॅापिंग मॅाल : २, राजापुष्प प्रॅापर्टीज : २०, इनॲार्बिट मॉल्स इंडिया : २५, कल्पतरु प्रोजेक्ट्स : २५, चांद्रज्योती इस्टेट डेव्हलपर्स : १०.