अतिशय वेगवान, अत्याधुनिक सुविधा, पूर्णतः वातानुकूलित एक्स्प्रेस अशी ख्याती असलेल्या तेजस एक्स्प्रेसबद्दल प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. मध्य आणि कोकण रेल्वेवर धावणाऱ्या मुंबई – मडगाव तेजस एक्स्प्रेसचे स्वयंचलित दरवाजे अर्धवट बंद होत असून मनोरंजन स्क्रीन, वायफाय आणि यूएसबी साॅकेट आदी सुविधा बंदच आहेत. विशेष म्हणजे तेजस एक्स्प्रेसमधील जेवणाचा दर्जाही घसरल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे एकेकाळी ‘ब्रॅण्ड’ म्हणून धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसचा अल्पावधीतच बोऱ्या वाजल्याची चर्चा आहे.

मुंबई – गोव्यादरम्यानचा प्रवास जलदगतीने करण्यासाठी प्रवासी सीएसएमटी – मडगाव तेजस एक्स्प्रेसला (गाडी क्रमांक २२११९) पसंती देत आहेत. जलद प्रवासासोबत अत्याधुनिक सुविधांचा लाभ होईल या अपेक्षेने प्रवासी अधिक पैसे मोजत आहेत. मात्र, प्रवास जलद होत असला, तरी या एक्स्प्रेसमधील सुविधांच्या अभावामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. याच मार्गावर जनशताब्दी एक्स्प्रेस धावत असून या एक्स्प्रेसच्या तिकिटाचे दर तेजसच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे प्रवासी तेजस एक्स्प्रेसबद्दल खंत व्यक्त करू लागले आहेत.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

तेजस एक्स्प्रेसमधील जेवण निकृष्ट दर्जाचे असते. पनीर मसाल्यात पाणी मिसळले जाते. तीन बटाट्याच्या फोडींची भाजी आणि जाडजूड पोळ्या दिल्या जात असल्याची तक्रार प्रवासी करीत आहेत.

हेही वाचा >>> बांधकाम व्यवसायातील दलालांच्या पहिल्या परीक्षेचा निकाल जाहीर; ४२३ पैकी ४०५ उमेदवार यशस्वी,पहिल्या परीक्षेचा ९६ टक्के निकाल

तेजस एक्स्प्रेसमधील दुरावस्थेतबाबतची माहिती घेऊन कळवण्यात येईल.

– डॉ.शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

जेवण आणि नाश्त्याविषयी प्रत्येक प्रवाशाचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे काहींना जेवण योग्य किंवा काहींना अयोग्य वाटते. मोठ्या संख्येने तक्रारी आल्यास, त्या प्राधान्याने सोडविण्यात येतील.

– राहुल हिमालियन, समूह महाव्यवस्थापक, आयआरसीटीसी, पश्चिम विभाग

२३ मे रोजी ठाणे ते कुडाळ प्रवास करताना तेजस एक्स्प्रेसमधील प्रवासीभिमुख सेवेची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. तेजस एक्स्प्रेसचे ठाणे ते कुडाळ भाडे १,४३० रुपये आहे. तर, जनशताब्दीचे वातानुकूलितचे भाडे ८४५ रुपये आहे. मात्र, तेजस आणि जनशताब्दी या दोन्ही एक्स्प्रेसची सेवा एकसमान असल्यासारखेच  भासत आहे. तसेच, खानपानाची सेवाही निकृष्ट ठरत आहे.

– श्रेयस पटवर्धन, प्रवासी

Story img Loader