पुतळाबाई चाळीतील ‘लालबागचा राजा’ हा मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध असा गणपती आहे. लालबागचा राजाचं मोहक रूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी आणि फक्त त्याची एक झलक पाहण्यासाठी असंख्य गणेशभक्त तासंतास रांगेत उभे असतात. या संपूर्ण परिसरात गणेशोत्सवाचे १० दिवस अत्यंत जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं. अर्थात प्रचंड गर्दी देखील असते. मात्र, करोना महामारीच्या
पार्श्वभूमीवर खबरदारी घेता यंदाचा गणेशोत्सव देखील शासन निर्णयानुसारच होणार असल्याची घोषणा ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ने केली आहे. म्हणून, गर्दी टाळण्याच्या उद्देशाने मंडळाने गणेश भक्तांसाठी घरबसल्या ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध केली आहे. ‘लालबागचा राजा’चं लाईव्ह प्रक्षेपण केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंडळ आणि पोलिसांमध्ये वाद, प्राणप्रतिष्ठापनेला काहीसा विलंब

‘लालबागचा राजा’च्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पूजेला काहीसा विलंब झाला आहे. काही वेळापूर्वी पोलिसांकडून मंडळाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचप्रमाणे, मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील देखील या ठिकाणी दाखल झाले होते. पोलिसांनी नोटीस पाठवून लालबागच्या राजाची स्थापना करणारे स्थानिक व्यापारी आणि दुकानदारांची दुकानं बंद केल्याने लालबाग मार्केटमधील स्थानिक रहिवासी प्रचंड नाराज होते. अखेर मंडळ पदाधिकाऱ्यांसोबत साधारणतः तासभर चर्चा झाल्यानंतर पोलीस आणि मंडळांच्या समन्वयाने हा प्रश्न सुटला आहे.

यंदाही गणेशभक्तांना ‘लालबागचा राजा’चं प्रत्यक्ष दर्शन घेण्यास मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे. त्याचसोबत, आरतीच्या वेळी गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे. यावेळी मंडळानेही सर्व नियमांचं पालन करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यानंतर, अखेर मंडळ पदाधिकारी आणि पोलिसांमधील वाद समन्वयाने मिटला असून ‘लालबागचा राजा’च्या प्राणप्रतिष्ठापन पूजेला सुरुवात झाली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalbaugcha raja 2021 live darshan this year gst
First published on: 10-09-2021 at 12:46 IST