गेल्या काही वर्षांपासून वांद्रे-कुर्ला संकुलातील वाढत्या वाहतुकीवर उपाययोजना म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने २५ हायब्रिड बसगाडय़ा विकत घेतल्या आहेत. या गाडय़ा वांद्रे-कुर्ला संकुलापासून कुर्ला, वांद्रे आणि शीव या उपनगरीय स्थानकांपर्यंत चालवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या गाडय़ांसाठी एमएमआरडीए रस्त्यावरील एक माíगका राखीव ठेवणार असल्याने प्रवाशांना व गाडय़ांनाही त्याचा फायदा होणार आहे. या राखीव माíगकेसाठी बेस्ट, वाहतूक पोलीस आणि एमएमआरडीए यांनी याआधीही चाचणी केली आहे.
स्मार्ट बीकेसी या प्रकल्पांतर्गत वांद्रे-कुर्ला संकुलातील परिवहन स्थिती आणि इतर पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून एमएमआरडीएने स्वच्छ आणि प्रदूषणविरहित इंधन असलेल्या २५ बसगाडय़ा विकत घेण्याचा करार टाटा मोटर्सबरोबर केला. मात्र त्यापुढे जात एमएमआरडीएने आता या बसगाडय़ांसाठी मोकळा रस्ता ठेवण्याचाही प्रयत्न सुरू केला आहे.
या वांद्रे-कुर्ला संकुलात येण्यासाठी प्रवासी वांद्रे, कुर्ला किंवा शीव या स्थानकांना पसंती देतात. त्यामुळे बेस्टनेही या स्थानकांतून वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंत येण्यासाठी सेवा पुरवली आहे. या नव्या गाडय़ा बेस्टच्या ताफ्यातच समाविष्ट होणार असून बेस्टने त्याला तत्त्वत: मान्यताही दिल्याचे एमएमआरडीए प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. मात्र या गाडय़ा बीकेसीतून या स्थानकांपर्यंत पोहोचताना अनेकदा मधल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी रिक्षा किंवा इतर वाहनांना पसंती देत असल्याचे आढळले आहे. या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी एमएमआरडीए या गाडय़ांसाठी खास माíगका राखीव ठेवणार आहे. या माíगकेतून जाण्याची परवानगी या हायब्रिड गाडय़ांनाच असेल. त्यामुळे येत्या काळात वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंतचा प्रवास प्रवाशांसाठी सुलभ होणार आहे.