मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरद पवार) १५ नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत काही जुन्या नावांसह अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमद आणि पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेतील मारहाण प्रकरणी चर्चेत आलेले नितीन देशमुख यांचा समावेश आहे. पक्षाचे गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमावर या बाबतचा संदेश प्रसारित करून नावे जाहीर केली आहेत.
नव्याने नियुक्त झालेल्या प्रवक्त्यांच्या यादीत विद्याताई चव्हाण, अंकुश काकडे, सुधाकर भालेराव, भीमराव हत्तीअंबिरे, महेश तपासे, विकास लावंडे, सक्षणा सलगर, मेहबूब शेख, फहाद अहमद, राजा राजपूरकर, मनाली भिलारे, नितीन देशमुख, क्लाइड क्रास्टो, राखी जाधव आणि रचना वैद्य यांचा समावेश आहे.