केवळ पासधारकांना परवानगी असल्याने अन्य प्रवासी नाराज
मुंबई: निर्बंध शिथिल झाल्यावर वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे गुरुवारपासून (२८ ऑक्टोबर) मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर १०० टक्के लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. वाढीव फेऱ्यांचा दिलासा मिळाला असला, तरी लोकल प्रवासासाठी पासची सक्ती असल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. तिकीट मिळत नसल्याने आठवड्यातील एक-दोन दिवसाच्या प्रवासासाठी महिन्याचा पास घेणे परवडणारे नाही, अशी खंत प्रवासी व्यक्त करीत आहेत.
टाळेबंदीमुळे २२ मार्च २०२० पासून लोकल सेवा बंद होती. त्यानंतर १५ जून २०२० पासून लोकल अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी सुरू झाली. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत परिस्थिती पाहून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. अत्यावश्यक सेवा कर्मचारी, दोन लसमात्रा घेतलेले प्रवासी आणि १८ वर्षांखालील प्रवाशांना प्रवासाची परवानगी मिळाल्यानंतर प्रवासी संख्येत प्रचंड वाढ झाली. ही वाढ पाहता करोनाकाळात कमी असलेल्या फेऱ्या गुरुवारपासून पूर्ववत करण्याची सूचना राज्य सरकारकडून करण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे बोर्डाने मंजुरी देताच मध्य व पश्चिाम रेल्वेने लोकलच्या फे ऱ्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला.
करोनापूर्वी मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर दररोज १,७७४
लोकल फेऱ्या, तर पश्चिाम रेल्वेवर १,३६७ फेऱ्या होत होत्या. त्यानंतर मध्य रेल्वेवर १,७०२ आणि पश्चिाम रेल्वेवर १,३०४ फेऱ्या होत होत्या. आता १०० टक्के क्षमतेने लोकल सुरू झाल्या असल्या तरीही प्रवाशांना अद्यापही तिकीट देण्यात येत नसून मासिक पास घेण्याचीच सक्ती के ली जात आहे. तिकीट खिडक्यांसमोर अधिक रांगा लागू नये, तसेच लोकल गाड्यांनाही फारशी गर्दी होऊ नये अशी कारणे देऊन घेतलेल्या या निर्णयाविरोधात नाराजीचा सूर आहे.
अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांबरोबरच दोन लसमात्रा घेतलेले आणि १८ वर्षाखालील प्रवासीही आहेत. ज्या प्रवाशांच्या दोन लसमात्रा झालेल्या नाहीत, त्यांच्याकडून विनातिकीट प्रवास किं वा बनावट ओळखपत्राच्या आधारे पास मिळवून प्रवास के ला जात आहे. त्यामुळे कार्यालयीन वेळेत सकाळी व सायंकाळी घर गाठताना लोकल गाड्यांना प्रचंड गर्दी होत आहे. निर्बंध शिथिल के ल्याने अनेक जण कामानिमित्त बाहेर पडू लागले आहेत. परंतु आठवड्यातून एक किं वा दोन दिवस कामानिमित्त बाहेर जाणाऱ्यांना लोकल प्रवास करता येत नाही. त्यासाठी मासिक पास घ्यावा लागत असून ही सक्ती योग्य नाही. राज्य सरकार व रेल्वेनेही याचा विचार करावा आणि तशी मागणी वारंवार के ल्याचे उपनगरीय एकता प्रवासी संस्थेच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी सांगितले.
तिकीट यंत्रेही बंद
मध्य व पश्चिाम रेल्वेवर मासिक पास तिकीट खिडक्यांवर दिला जात आहे. त्यामुळे तिकीट खिडक्यांसमोर पास घेण्यासाठी रांगाही असतात. तिकीट सुविधाच नसल्याने मोबाइल तिकीट सेवा, एटीव्हीएम, जनसाधारण तिकीट सुविधाही बंद ठेवली आहे.
माझ्या दोन लसमात्रा झालेल्या आहेत. मी एलआयसीचे काम करतो. मुंबई किं वा अन्य ठिकाणी आठवड्यातून एक किं वा दोन दिवस कामानिमित्त बाहेर जाणे होते. परंतु त्यासाठी संपूर्ण महिन्याचा पास घ्यावा लागतो. नागरिकांना पाससाठी होणारा भुर्दंड लक्षात घेऊन शासनाने तिकीट सुविधा उपलब्ध करावी.-संतोष सकपाळ, ठाणे रहिवासी