उत्तर- मध्य मुंबई

मुंबई : उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघ मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मराठी आणि मुस्लीम मतदारांचा म्हणून ओळखला जातो. येथे मराठी ३४ टक्के आणि मुस्लीम २४ टक्के मतदार आहेत. या वेळी पाचव्या टप्प्याचे मुंबईतील मतदान सर्वत्र संथ पार पडले. या मतदारसंघात ५१.४२ टक्के मतदान नोंदले आहे. वर्षा गायकवाड या महिला उमेदवार असूनही येथे महिलांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसले.

२०१९ च्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघात ५३ टक्के मतदान झाले होते. काँग्रेसने येथे भाजप उमेदवार उज्ज्वल निकम हे उपरे उमेदवार असल्याचा प्रचार केला होता. महागाई, बेरोजगारी आणि झोपड्यांचा पुनर्विकास यावरही काँग्रेसच्या प्रचाराचा भर होता. भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांचा प्रचार दहशतवाद आणि मोदींची हॅट्ट्रिक याभोवती फिरत होता. निकम यांचे मुद्दे येथील मतदारांना भावल्याचे काही दिसले नाही.

हेही वाचा >>> मराठा समाजावरील योजनांच्या प्रसिद्धीसाठी २६ कोटी

मतदानाच्या दिवशी गुजराती आणि मुस्लीम मतदारांच्या मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा होत्या. दुपारनंतर मराठी मतदार मोठ्या संख्येने मतदानास बाहेर पडले होते. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी येथील निवडणूक हाती घेतल्याचे दिसले. उत्तर भारतीय आणि गुजराती मतदार भाजपच्या बाजूने गेल्याचे दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांदिवली या मतदारसंघातील एक विधानसभा क्षेत्र आहे. येथे मराठी, ख्रिाश्चन आणि मुस्लीम मतदार बहुसंख्येने आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा येथे आमदार आहे. चांदिवलीच्या भोवती येथील निवडणूक फिरताना दिसते आहे. वंचितने येथे दलित उमेदवार दिला आहे. बसप आणि एमआयएमचे उमेदवार मुस्लीम आहेत. परिणामी, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या मतदानावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.