वय आणि व्यवसायानुसार आहार सुचवणाऱ्या तब्बल ४०० हून अधिक पाककृतींचा समावेश असलेला ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ विशेषांक आता मोबाइल व टॅबवर उपलब्ध होणार आहे. ‘पूर्णब्रह्म’मधील सर्व पाककृती वैद्य खडीवाले यांनी सिद्ध केल्या आहेत. वाचकांचा या पाककृती संग्रहाला उदंड प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे ‘पूर्णब्रह्म’ पाककृती संग्रहाचे पुनर्मुद्रणही करावे लागले होते. आता हा पाककृती संग्रह मोबाइल आणि टॅबवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी क्यूआर कोड देण्यात आला असून तो स्कॅन केल्यानंतर मोबाइल व टॅबवर ‘पूर्णब्रह्म’ डाऊनलोड होऊ शकणार आहे.   अधिक माहितीसाठी indianexpress-loksatta.go-vip.net वर लॉग ऑन करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta launches purnabrahma on mobile
First published on: 29-08-2015 at 05:49 IST