सामाजिक विषयांवर व्यक्त होण्याची विद्यार्थ्यांची धिटाई, सादरीकरणातील नावीन्य यामुळे चुरशीच्या झालेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धेत औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागाची ‘मादी’ ही महाराष्ट्राची लोकांकिका ठरली. लेखन, नैपथ्य, अभिनय या वैयक्तिक पारितोषिकांसह मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालय, आनंदभवनच्या ‘देव हरवला’ या एकांकिकेने द्वितीय पारितोषिक पटकावले. अभिनय, संगीत या वैयक्तिक पारितोषिकांसह पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयाच्या संघाने तृतीय पारितोषिक पटकावले.

एकांकिकांची परंपरा सक्षमपणे पुढे नेणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पाचव्या पर्वाची महाअंतिम फेरी माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिरात जल्लोषात पार पडली. नाटय़-चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ, कलावंत, नाटय़रसिक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणाईने गर्दी केली होती. नागपूर, नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई, कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी अशा आठ विभागांमध्ये अव्वल ठरलेल्या एकांकिकांमध्ये चूरस रंगली. विषयांचे वैविध्य आणि त्याला प्रयोगशीलतेची जोड हे पहिल्या पर्वापासून या स्पर्धेचे वैशिष्ट ठरले. यंदाही सामाजिक विषयांना हात घालत या महाविद्यालयांच्या संघांनी उत्तम मांडणी केल्याचे पाहावयास मिळाले.

AMU gets its first woman VC Naima Khatoon
व्यक्तिवेध : नईमा खातून
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
youth beaten, love jihad
‘लव्ह जिहाद’चा आरोप करून तरुणाला मारहाण… सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा

स्पर्धकांच्या सादरीकरणातील प्रयोगशीलतेला प्रेक्षकांचीही उत्स्फुर्त दाद मिळत होती. महाराष्ट्राची लोकांकिक म्हणून ‘मादी’ या एकांकिकेचे नाव जाहीर झाले आणि टाळ्या, आवाज कुणाचा, हिप हिप हुर्रे.. आशा आरोळ्यांनी प्रेक्षागृह दणाणून गेले. दिग्दर्शन, प्रकाश योजना, अभिनय आशा वैयक्तिक परितोषिकांसह मराठवाडा विद्यापीठाच्या संघाने बाजी मारली.

सेट आला का, लाईट्सचे काय झाले असे हाकारे, गडबड.. पण तीदेखील शिस्तीत, सादरीकरणाचे थोडेसे दडपण.. पण त्याचवेळी प्रतिस्पर्धी संघालाही सांभाळून घेण्याचा खिलाडूपणा अशी पडद्यामागची घाई .. प्रत्येक विभागातील सवरेत्कृष्ट एकांकिका पाहण्यासाठी उत्सुकतेने भारलेले प्रेक्षागृह, जल्लोष, प्रत्येक सादरीकरणाला कौतुकाने मिळणारी उत्स्फुर्त दाद अशा वातावरणात ही महाअंतिम फेरी शनिवारी रंगली.

ज्येष्ठ नाटककार शफाअत खान, अभिनेते सचिन खेडेकर, अभिनेत्री चिन्मयी सुमीत हे या फेरीसाठी परीक्षक होते. रंगभूमी ते चित्रपटसृष्टी असा प्रवास ताकदीने करणारे प्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी स्पर्धकांचे कौतुक करण्यासाठी सॉफ्ट कॉर्नरचे दिलीप कुलकर्णी, केसरी टूर्सचे प्रमोद दळवी, पितांबरीचे परिक्षित प्रभुदेसाई आणि उदय आगाशे, आयओसीएलचे प्रदीप काळे, अस्तित्वचे रवी मिश्रा उपस्थित होते.

प्रायोजक

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ साठी पॉवर्ड बाय पार्टनर होते इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, स्पर्धेचे टॅलेन्ट हंट पार्टनर ‘आयरिस प्रॉडक्शन’ असून ‘एरेना मल्टीमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’साठी ‘झी मराठी’ हे टेलिकास्ट पार्टनर आणि ‘एबीपी माझा’ हे न्यूज पार्टनर होते.

  • सर्वोत्कृष्ट एकांकिका (प्रथम) – ‘मादी’, नाटय़शास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
  • सर्वोत्कृष्ट एकांकिका (द्वितीय) – ‘देव हरवला’, सिद्धार्थ महाविद्यालय आनंदभवन, मुंबई
  • सर्वोत्कृष्ट एकांकिका (तृतीय) – ‘आशा’, फर्गसन महाविद्यालय
  • विनय आपटे स्मृती सवरेत्कृष्ट दिग्दर्शक पारितोषिक – रावबा गजमल, (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद)
  • सवरेत्कृष्ट लेखक – राहूल बेलापूरकर, (सिद्धार्थ महाविद्यालय, आनंदभवन, मुंबई)
  • सर्वोत्कृष्ट अभिनय – प*वी कुलकर्णी, (भूमिका- सीता, एकांकिका- मादी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
  • सर्वोत्कृष्ट अभिनय – ऐश्वर्या फडके (भूमिका – हायपेशिया, एकांकिका – आशा), फर्गसन महाविद्यालय, पुणे
  • सवरेत्कृष्ट अभिनय – आकाश रुके (भूमिका – पंढरी, एकांकिका – देव हरवला), सिद्धार्थ महाविद्यालय आनंदभवन, मुंबई
  • सवरेत्कृष्ट नेपथ्य – देवाशिष / तनया, (सिद्धार्थ महाविद्यालय, आनंदभवन, मुंबई)
  • सवरेत्कृष्ट संगीत – शंतनु वेल्हाळ, मुकुंद कोंडे, अथर्व निगडे (फर्गसन महाविद्यालय पुणे)
  • सवरेत्कृष्ट प्रकाशयोजना – रामेश्वर देवरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद