राज्यामधील करोनाग्रस्तांची संख्या ३९ वर पोहचली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकार आणखीन काही ठोस निर्णय घेण्यासंदर्भात संबंधित अधिकारी आणि मंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती टोपे यांनी सोमवारी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली होती. गर्दीने प्रवास केला जाणाऱ्या सार्वजनिक वाहतूक सेवांमधील प्रवाशी संख्या कमी करण्यासंदर्भातील चर्चाही झाल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले होते. याचसंदर्भात मंगळवारी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये लोकल सेवा तसेच सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करण्यासंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अशापद्धतीने सार्वजनिक वाहतूक बंद केल्याने करोनाचा फैलाव थांबेल यावरुन मतमतांतरे असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने लोकांचे मत जाणून घ्या घेण्याचे प्रयत्न केला आहे.
मुंबई लोकल आणि सार्वजनिक वाहतूक सेवा बंद केल्याने करोनाचा फैलाव थांबेल असं वाटतं का?, असा सवाल ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने वाचकांना विचारला आहे. फेसबुकवर यासंदर्भात तुमचे मत नोंदवण्यासाठी येथे क्लिक करा. किंवा खालील पोलवर क्लिक करुन तुम्ही या जनमत चाचणीमध्ये तुम्ही थेट सहाभागी होऊ शकता.
ट्विटवरही यासंदर्भात तुम्ही आपले मत नोंदवू शकता. ट्विटवर आपले मत नोंदवण्यासाठी येथे क्लिक करा. किंवा थेट सहभागी होण्यासाठी खालील पोलवर क्लिक करुन आपले मत नोंदवा.
#LoksattaPoll:
मुंबई लोकल आणि सार्वजनिक वाहतूक सेवा बंद केल्याने करोनाचा फैलाव थांबेल असं वाटतं का?#Mumbai #caronavirusoutbreak— LoksattaLive (@LoksattaLive) March 17, 2020
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
“सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये उभं राहून रेटारेटी करत जो प्रवास करणारी गर्दी असते ती कमी करण्यासंदर्भात निर्णय घेणं गरजेचे असल्याचीही चर्चा सोमवारी पार पडलेल्या आऱोग्य खात्याच्या बैठकीमध्ये झाल्याचे, टोपे यांनी स्पष्ट केलं होतं. यावरुन आरोग्य खात्याच्या बैठकीमध्ये लोकल सेवेसंदर्भात निर्णय घेण्यावर चर्चा झाल्याचे समजते. मात्र आता सरकार काय निर्णय घेतं याकडे मुंबईकरांसहीत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेलं आहे.