मुंबई : आरोग्यदायी आणि तितक्याच चविष्ट पाककृतींनी परिपूर्ण ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या विशेषांकाचे येत्या बुधवारी, दिनांक १८ जानेवारी रोजी ठाणे येथे प्रकाशन होणार आहे. यानिमित्ताने घरोघरच्या केवळ सुगरणींसाठीच नाही तर सर्वासाठी खुल्या पाककृती स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे.

आयुर्वेदिक आहार, पौष्टिक भरडधान्यांच्या वैशिष्टय़पूर्ण पाककृती आणि रानभाज्यांच्या पाककृतींचा खजिनाच यंदाच्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ अंकात वाचकांना मिळणार आहे. १८ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता ठाणे येथील ‘हॉटेल टिप टॉप प्लाझा’ येथे या अंकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या प्रकाशनाच्या निमित्ताने याच ठिकाणी होणाऱ्या पाककला स्पर्धेसाठी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत ‘रत्नमाला’ची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ तसेच सेलिब्रिटी शेफ वरुण इनामदार उपस्थित राहणार असून ते स्पर्धेतील पाककृतींचे परीक्षणही करणार आहेत. या स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पौष्टिक व आरोग्यदायी असा कोणताही एकच पदार्थ स्वत: तयार करून आणायचा आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कार्यक्रमापूर्वी तिथेच नोंदणी करता येईल. कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्यांना निवेदिता सराफ आणि वरुण इनामदार यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच या वेळी त्यांच्याशी भरपूर टिप्स देणाऱ्या खाद्यविषयक गप्पांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.

Muralidhar Mohol, Mahayuti meeting,
पुणे : महायुतीची नदीपात्रात सभा, मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार
Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
first case registered for violation of code of conduct in mira road
मिरा रोड येथे आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल
mumbai passengers marathi news, local train marathi news
सुट्टीकालीन लोकल वेळापत्रकाने प्रवासी हैराण, गुड फ्रायडेच्या दिवशी लोकलचा खोळंबा

स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पौष्टिक व आरोग्यदायी असा कोणताही एक पदार्थ स्वत: तयार करून आणायचा आहे. परीक्षकांनी निवड केलेल्या पाककृतींना बक्षिसे देऊन गौरविण्यात येईल. त्याचप्रमाणे तांदळापासून पौष्टिक व नावीन्यपूर्ण पदार्थ बनविणाऱ्या स्पर्धकाला खास पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल.