Maharashtra vidhan sabha election 2019 Result
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून मुंबईत शिवसेना-भाजपा युतीने दणदणीत विजय मिळवला आहे. चार ते पाच मतदारसंघ वगळता सर्वत्र शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार निवडून आले आहेत.
माहिम, घाटकोपर पश्चिम, वडाळा, वांद्रे पूर्व या चार मतदारसंघांची चर्चा होती. त्यात वांद्रे पूर्वचा अपवाद वगळता अन्य तीन मतदारसंघ शिवसेना-भाजपाने कायम राखले आहेत.
वांद्र पूर्वमधून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला आहे. शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांच्या बंडखोरीमुळे या मतदारसंघातून काँग्रेसच्या झिशान सिद्दीकी यांनी विजय मिळवला आहे.

मुंबादेवी – अमीन पटेल (काँग्रेस), धारावी – वर्षा गायकवाड (काँग्रेस), वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी (काँग्रेस), मानखुर्द – अबू आझमी (समाजवादी पार्टी), अणूशक्तीनगर – नवाब मलिका (राष्ट्रवादी काँग्रेस)
बोरीवली – सुनील राणे (भाजपा), घाटकोपर पूर्व – पराग शाह (भाजपा), दहिसर – मनिषा चौधरी ( भाजपा), मुलुंड – मिहीर कोटेचा ( भाजपा), कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर ( भाजपा), चारकोप – योगेश सागर (भाजपा), गोरेगाव – विद्या ठाकूर (भाजपा), अंधेरी पश्चिम – अमित साटम (भाजपा), विलेपार्ले – पराग अळवणी (भाजपा), घाटकोपर पश्चिम – राम कदम (भाजपा), वांद्रे पश्चिम – आशिष शेलार (भाजपा), सायन कोळीवाडा – कॅप्टन तमिळ सेलवन (भाजपा), वडाळा – कालिदास कोळंबकर (भाजपा), मलबार हिल – मंगलप्रभात लोढा (भाजपा), कुलाबा – राहुल नार्वेकर (भाजपा)
बोरीवली – सुनील राणे (भाजपा), घाटकोपर पूर्व – पराग शाह (भाजपा), दहिसर – मनिषा चौधरी ( भाजपा), मुलुंड – मिहीर कोटेचा ( भाजपा), कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर ( भाजपा), चारकोप – योगेश सागर (भाजपा), गोरेगाव – विद्या ठाकूर (भाजपा), अंधेरी पश्चिम – अमित साटम (भाजपा), विलेपार्ले – पराग अळवणी (भाजपा), घाटकोपर पश्चिम – राम कदम (भाजपा), वांद्रे पश्चिम – आशिष शेलार (भाजपा), सायन कोळीवाडा – कॅप्टन तमिळ सेलवन (भाजपा), वडाळा – कालिदास कोळंबकर (भाजपा), मलबार हिल – मंगलप्रभात लोढा (भाजपा), कुलाबा – राहुल नार्वेकर (भाजपा)
मुंबईतील विजयी शिवसेना उमेदवार
वरळी – आदित्य ठाकरे (शिवसेना), माहिम – सदा सरवणकर (शिवसेना), शिवडी – अजय चौधरी (शिवसेना), कुर्ला – मंगेश कुडाळकर (शिवसेना), विक्रोळी – सुनील राऊत (शिवसेना), दिंडोशी – सुनील प्रभू (शिवसेना), मागाठणे – प्रकाश सुर्वे (शिवसेना), भांडूप पश्चिम – रमेश कोरगावकर (शिवसेना), जोगेश्वरी पूर्व – रविंद्र वायकर (शिवसेना), अंधेरी पूर्व – रमेश लटके (शिवसेना), चेंबूर – प्रकाश फातर्पेकर (शिवसेना), कलिना – संजय पोतनीस (शिवसेना), भायखळा – यामिनी जाधव (शिवसेना)
मुंबईतील विजयी शिवसेना उमेदवार
वरळी – आदित्य ठाकरे (शिवसेना), माहिम – सदा सरवणकर (शिवसेना), शिवडी – अजय चौधरी (शिवसेना), कुर्ला – मंगेश कुडाळकर (शिवसेना), विक्रोळी – सुनील राऊत (शिवसेना), दिंडोशी – सुनील प्रभू (शिवसेना), मागाठणे – प्रकाश सुर्वे (शिवसेना), भांडूप पश्चिम – रमेश कोरगावकर (शिवसेना), जोगेश्वरी पूर्व – रविंद्र वायकर (शिवसेना), अंधेरी पूर्व – रमेश लटके (शिवसेना), चेंबूर – प्रकाश फातर्पेकर (शिवसेना), कलिना – संजय पोतनीस (शिवसेना), भायखळा – यामिनी जाधव (शिवसेना)
वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक विजयी झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून भाजपाला अपेक्षेइतक्या जागा मिळाल्या नाहीत. तरी नरीमन पाँईट येथील भाजपा कार्यालयाबाहेर किरीट सोमय्या यांच्याबरोबर भाजपा कार्यकर्ते जल्लोष करताना.
पालघरमधून शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा विजयी. वरळीत आदित्य ठाकरे यांच्याकडे ९२ हजार मतांची विजयी आघाडी. वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार विजयी.
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत सुरु आहे. शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केल्यामुळे विश्वनाथ महाडेश्वर यांची वाट बिकट बनली आहे. तृप्ती सावंत यांच्या बंडखोरीचा फटका शिवसेनेला बसताना दिसत आहे.
ठाण्यात शिवसेनेने आपला गड राखला असून ओवळा-माजीपाडामधून शिवसेनेचे प्रताप सरनाईक आणि कोपरी-पाचपाखाडीमधून एकनाथ शिंदे विजयी झाले आहेत. घाटकोपर पूर्वमधून भाजपाचे पराग शाह विजयी झाले आहेत. भाजपाने यावेळी प्रकाश मेहता यांचे तिकीट कापून पराग शाह यांना उमेदवारी दिली होती.
बोरीवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे सुनील राणे विजयी झाले आहेत. ते वरळीमध्ये राहतात. पण भाजपाने विनोद तावडे यांच्याजागी त्यांना उमेदवारी दिली होती. विनोद तावडे बोरीवलीमधून आमदार होते. पण भाजपाने त्यांचे तिकीट कापले व सुनील राणे यांना उमेदवारी दिली.
मुंबईत शिवसेना-भाजपा युतीने बहुतांश मतदारसंघात मोठी आघाडी घेतलेली आहे. चार ते पाच मतदारसंघांचा अपवाद वगळता आघाडीला फारसे यश मिळताना दिसत नाहीय. मुंबईच्या या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
भांडूप पश्चिम - सुरेश कोपरकर (काँग्रेस)
धारावी - वर्षा गायकवाड ( काँग्रेस)
अणूशक्तीनगर - नवाब मलिक ( राष्ट्रवादी काँग्रेस)
मालाड पश्चिम - अस्लम शेख ( काँग्रेस)
मानखुर्द शिवाजीनगर - अबू आझमी (समाजवादी पक्ष)
मुंबईच्या या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत.
चेंबूरमध्ये प्रकाश फतर्फेकर (शिवसेना)
माहिममधून सदा सरवणकर (शिवसेना)
दिंडोशीमधून सुनील प्रभू (शिवसेना)
मागाठणेमधून प्रकाश सुर्वे (शिवसेना)
विक्रोळीतून सुनील राऊत (शिवसेना)
जागेश्वरी पूर्वमधून रवींद्र वायकर (शिवसेना)
कुर्ल्यातून मंगेश कुडाळकर (शिवसेना)
वांद्रे पूर्वमधून विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना)
मुंबादेवीमधून पांडुरंग सकपाळ (शिवसेना)
शिवडीतून अजय चौधरी (शिवसेना)
वरळीतून आदित्य ठाकरे (शिवसेना)
बेलापूर, पनवेल आणि ऐरोली या तीन विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. बेलापूरमधून मंदा म्हात्रे पाच हजार, पनवेलमधून प्रशांत ठाकूर २६ हजार आणि एरोलीत गणेश नाईक २४ हजार मतांनी आघाडीवर आहेत. प्रशांत ठाकूर हे शेकाप, काँग्रेस असा प्रवास करुन २०१४ भाजपामध्ये दाखल झाले. प्रशांत ठाकूर यांचा सामना आता शेकापच्या हरेश केणी यांच्याशी आहे.
मुंबईत घाटकोपर पश्चिममधून राम कदम यांची जागा चर्चेत होती. अपेक्षेप्रमाणे भाजपाचे राम कदम आघाडीवर आहेत. शिवडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तिथून अजय चौधरी यांनी मोठी आघाडी घेतली आहे. मुंबईत ३६ पैकी ३१ विधानसभा मतदारसंघात महायुती आघाडीवर आहे.
शिवडी - अजय चौधरी (शिवसेना)
घाटकोपर पूर्व - पराग शहा (भाजप)
घाटकोपर पश्चिम - राम कदम ( भाजपा)
सायन कोळीवाडा - कॅप्टन तामिळ सेलवन (भाजप)
वरळी - आदित्य ठाकरे (शिवसेना)
वडाळा - कालिदास कोळंबकर (भाजपा)
माहिम - सदा सरवणकर (शिवसेना)
मुंबईत घाटकोपर पश्चिममधून राम कदम यांची जागा चर्चेत होती. अपेक्षेप्रमाणे भाजपाचे राम कदम आघाडीवर आहेत. शिवडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तिथून अजय चौधरी यांनी मोठी आघाडी घेतली आहे. मुंबईत ३६ पैकी ३१ विधानसभा मतदारसंघात महायुती आघाडीवर आहे.
शिवडी - अजय चौधरी (शिवसेना)
घाटकोपर पूर्व - पराग शहा (भाजप)
घाटकोपर पश्चिम - राम कदम ( भाजपा)
सायन कोळीवाडा - कॅप्टन तामिळ सेलवन (भाजप)
वरळी - आदित्य ठाकरे (शिवसेना)
वडाळा - कालिदास कोळंबकर (भाजपा)
माहिम - सदा सरवणकर (शिवसेना)
माहिममध्ये तिसऱ्या फेरीअखेर शिवसेनेचे सदा सरवणकर यांच्याकडे तीन हजार मतांची आघाडी आहे. संदीप देशपांडे दुसऱ्या स्थानावर आहेत. काँग्रेसचे उमेदवार प्रवीण नाईक यांना सुद्धा बऱ्यापैकी मते मिळाली आहेत. २०१४ साली सुद्धा मनसेचे नितीन सरदेसाई आणि सदा सरवणकर यांच्यामध्ये चुरशीचा सामना झाला होता. अगदी अखेरच्या फेरीपर्यंत उत्सुक्ता ताणली गेली होती. त्यावेळी सदा सरवणकर अगदी थोडक्या मताधिक्क्याने विजयी झाले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी एक चांगली बातमी आहे. कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार आघाडीवर आहेत. कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील आणि डोंबिवलीमधून मनसेचे मंदार हळबे हे निसटत्या मतांनी आघाडीवर आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये मनसेची लढत शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांच्याबरोबर आहे तर डोंबिवलीत मनसेचा सामना भाजपाच्या रविंद्र चव्हाण यांच्याबरोबर आहे.
मुंबईप्रमाणे ठाण्यातही शिवसेना-भाजपा युतीने मोठी आघाडी घेतली आहे.
ठाण्यातही शिवसेना-भाजपा युती मोठया आघाडीवर आहे.
ठाणे - संजय केळकर (भाजपा)
कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदे (शिवसेना)
कळवा मुंब्रा - जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी)
अंबरनाथ - डॉ. बालाजी किणीकर (शिवसेना)
भिवंडी पूर्व - रुपेश म्हात्रे (शिवसेना)
कुर्ला - मंगेश कुडाळकर (शिवसेना)
वांद्रे पूर्व - विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना)
गोरेगाव - विद्या ठाकूर ( भाजपा)
दिंडोशी - सुनिल प्रभू ( शिवसेना)
कांदिवली - अतुल भातखळकर (भाजपा)
दहिसर - मनिषा चौधरी ( भाजपा)
मागाठणे - प्रकाश सुर्वे (शिवसेना)
मुलुंड - मिहीर कोटेचा ( भाजपा)
विक्रोळी - सुनील राऊत ( शिवसेना)
वांद्रे पूर्वची जागा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान या मतदारसंघात येते. शिवसेनेने या मतदारसंघात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली आहे. इथून विश्वनाथ महाडेश्वर आघाडीवर आहेत. या मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केल्याने आव्हान निर्माण झाले आहे.
मुंबईत विधानसभेच्या एकूण ३६ जागा आहेत. भाजपा १३ आणि शिवसेना १५ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला फक्त दोन जागांवर आघाडी मिळाली आहे. भांडूपमधून शिवसेनेचे रमेश कोरगावकर आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे सुरेश कोपरकर लढत आहेत.
मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर प्रारंभीचे जे कौल हाती आले आहेत त्यानुसार मुंबईत शिवसेना-भाजपा युतीने मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी युतीच्या तुलनेत पिछाडीवर पडली आहे. वरळीतून आदित्य ठाकरे यांनी मोठी आघाडी घेतली आहे.