आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक उभारण्याबाबतचा प्रश्न मार्गी लावण्यसााठी राज्य सरकारने धावपळ सुरू केली आहे. त्यानुसार या प्रकल्पाला गती देण्यासाठी १० ऑक्टोबरला मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजित करण्यात आली आहे. ही योजना मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून त्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्यांची पूर्तता करण्यात येत आहे. स्मारकाच्या जागेचा पर्यावरणीय अभ्यास करण्यासाठी निरी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून आठ महिन्यात त्यांचा अहवाल येईल. तोवर या स्मारकाचा आराखडा तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर इरादापत्रे मागविण्यात आले आहेत. त्यातील सर्वात चांगला आराखडा निवडणून त्यानंतर अंतिम आराखडा बनविण्याचे काम देण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Oct 2013 रोजी प्रकाशित
निवडणुकांपूर्वी शिवस्मारक मार्गी लावण्यासाठी सरकारची धावपळ
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक उभारण्याबाबतचा प्रश्न मार्गी लावण्यसााठी राज्य सरकारने धावपळ सुरू केली आहे.
First published on: 05-10-2013 at 12:05 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government in hurry to clear shivaji memorial before elections