करोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाउन व अन्य दिवस कडक निर्बंध लागू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.  राज्य सरकारच्या या निर्णयानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस पडला आहे.

महाराष्ट्रात लॉकडाउनसंबधी ट्विटरवर मीम्स

Bade Miyan Chote Miyan box office collection Day 8
‘बडे मियाँ छोटे मियाँ’चं बजेट ३५० कोटी, पण आठ दिवसांत कमावले फक्त…; अक्षय कुमार-टायगर श्रॉफच्या नावावर आणखी एक फ्लॉप
Bade Miyan Chote Miyan box office collection Day 2
अक्षय कुमारच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी घट, कमावले फक्त ‘इतके’ कोटी
they were cheating people by mixing water in petrol people of jaipur exposed watch viral video
तुम्ही गाडीत पेट्रोलबरोबर पाणी तर भरत नाही ना! पाहा पेट्रोलपंपावरील घोटाळ्याचा धक्कादायक VIDEO
Video: Woman Wants To Live Together With Husband, Lover.
VIDEO: नवराही हवा अन् बॉयफ्रेंडही…३ लेकरांची आई थेट विजेच्या खांबावर चढली; VIDEO व्हायरल

 

 

 

 

 

 

 

 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत राज्यात करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निर्णयांची माहिती दिली. राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाउन करण्यात येणार आहे. रात्री 8 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा 144 कलम लागू (जमावबंदी) असेल, असे मलिक यांनी सांगितले.

काय सुरू काय बंद?

राज्यात आठवड्याला लॉकडाउनमध्ये बंद पाळण्यात येणार आहे. या काळात राज्यातील गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र या काळात सार्वजनिक आणि खासगी वाहतूकीवर कोणतेही निर्बंध नसतील, अशी माहिती मलिक यांनी दिली.