दुष्काळ, बलात्कार व महिलांवरील अत्याचार यांसह अनेक गंभीर प्रश्न राज्याला भेडसावत असल्याने महाशिवरात्रीच्या पर्वणीवर मुख्यमंत्र्यांचे चहापान स्वीकारण्यापेक्षा ‘उपवास’ करायचा आणि दुष्काळात जनता उपाशी असल्याचे दाखवायचे किंवा अभिनव पध्दतीने सरकारचा निषेध करायचा, असा विचार विरोधक करीत आहेत. त्यांचा पवित्रा बहिष्काराचा असून सरकारला खडसावण्यासाठी कोणता मार्ग स्वीकारायचा, यावर विरोधी पक्षांच्या रविवारी सकाळी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरु होत असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी विरोधी पक्षाच्या नेत्यांना चहापानासाठी आमंत्रित केले आहे. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकण्याची परंपराच झाली आहे. त्यामुळे सरकारही हे अस्त्र आणि विरोधकांची भूमिका गांभीर्याने घेत नाही. त्याऐवजी चहापानाला जाऊन चहा न घेता मुख्यमंत्र्यांना नाराजीचे खडे बोल सुनवायचे किंवा अभिनव पध्दतीने निषेध करायचा, असा विचार विरोधी पक्षांचे नेते करीत आहेत. तर केवळ बहिष्कार टाकावा, असे काही नेत्यांना वाटत आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी भाजप, शिवसेना, मनसे नेत्यांची बैठक रविवारी सकाळी होईल. त्यावेळी चहापानाबाबत नेमकी कोणती भूमिका घ्यायची, हे ठरविले जाईल.
संग्रहित लेख, दिनांक 10th Mar 2013 रोजी प्रकाशित
मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांचे ‘उपवास’ अस्त्र ?
दुष्काळ, बलात्कार व महिलांवरील अत्याचार यांसह अनेक गंभीर प्रश्न राज्याला भेडसावत असल्याने महाशिवरात्रीच्या पर्वणीवर मुख्यमंत्र्यांचे चहापान स्वीकारण्यापेक्षा ‘उपवास’ करायचा आणि दुष्काळात जनता उपाशी असल्याचे दाखवायचे किंवा अभिनव पध्दतीने सरकारचा निषेध करायचा, असा विचार विरोधक करीत आहेत.
First published on: 10-03-2013 at 02:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra opposition parties may boycotts cms tea party