कुर्ला येथील सिटी किनारा हॉटेलमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. तीव्र क्षमतेच्या या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी बहुतेकजण हे हॉटेलमधील कर्मचारीच असल्याचेही सांगण्यात येत आहे. स्फोट झाल्यानंतर जखमींना नजीकच्या राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान जखमींपैकी आठ जणांना मृत घोषित करण्यात आले. सध्या अन्य जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. येथील होली क्रॉस रुग्णालयाच्या परिसरात असणाऱ्या या हॉटेलमध्ये ही दुर्देवी घटना घडली. दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही.