२०० फुटांपेक्षा खोल विंधणविहिरींवर र्निबध 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाणीटंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यात सध्या चार हजार ३५६ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यापैकी तीन हजार टँकर्स निव्वळ मराठवाडय़ात आहेत. टँकर्सची संख्या गेल्यावर्षीच्या तिप्पट आहे. भूजलसाठा खोलवर जात असल्याने राज्यभरात २०० फुटांपेक्षा खोल विंधणविहीर खोदण्यावर र्निबध लादले जाणार असून त्याचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार नियमावली तयार करीत असल्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.

उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पाणीटंचाई अधिकाधिक तीव्र होत आहे. परिणामी जलस्त्रोत आटत चालले असून टँकर्सची संख्या वाढत आहे. राज्य सरकारने सुमारे ७५० कोटी रुपयांच्या टंचाई आराखडय़ास मान्यता दिली असून त्यापैकी ५०० कोटी रुपयांचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. त्यात टँकरने पाणीपुरवठा, खराब पाईपलाईन बदलणे, जळलेले पंप बदलणे, टाक्यांची गळती थांबविणे आदी १७ उपाययोजना करुन पिण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी पावले टाकण्यात येत असल्याचे लोणीकर यांनी सांगितले.

जमिनीत पाणी मुरण्यापेक्षा त्याचा उपसा अधिक होत असल्याने भूजल पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे महाराष्ट्र भूजल अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाईल. त्याबाबत नियमावली तयार करण्यात येत  आहे.

विभागनिहाय टँकर

कोकण – ५२, नाशिक ८३१, पुणे ३०३, औरंगाबाद तीन हजार ३२, अमरावती १३१, नागपूर

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major water problem in maharashtra state
First published on: 19-04-2016 at 04:14 IST