scorecardresearch

मुंबई : छोटा राजनचा वाढदिवस साजरा करणाऱ्याला बेड्या, उद्धव ठाकरे गटाशी संबंध

टिळकनगर पोलिसांनी वाढदिवस साजरा करणारे उद्धव ठाकरे गटाचे नवी मुंबईचे संपर्कप्रमुख निलेश (आप्पा) पराडकर यांना अटक केली आहे.

मुंबई : छोटा राजनचा वाढदिवस साजरा करणाऱ्याला बेड्या, उद्धव ठाकरे गटाशी संबंध
छोटा राजनचा वाढदिवस साजरा करणाऱ्याला बेड्या (लोकसत्ता टीम)

मुंबई – जेलमध्ये असलेला कुख्यात गुंड छोटा राजन याचा वाढदिवस साजरा केल्याची छायाचित्रे दोन दिवसांपासून समाजमाध्यमांवर प्रसारीत होत आहेत. याबाबत टिळकनगर पोलिसांनी वाढदिवस साजरा करणारे उद्धव ठाकरे गटाचे नवी मुंबईचे संपर्कप्रमुख निलेश (आप्पा) पराडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून शनिवारी रात्री त्यांना अटक केली आहे.

विविध गुन्ह्यात अटक असलेला छोटा राजन याचा १३ जानेवारीला वाढदिवस होता. चेंबूरमध्ये उद्धव ठाकरे गटाचे नवी मुंबईचे संपर्कप्रमुख निलेश (आप्पा) पराडकर यांनी छोटा राजन याचा फोटो असलेला केक कापून वाढदिवस साजरा केला. समाजमाध्यमांवर या वाढदिवसाची छायाचित्रे प्रसारीत झाल्यानंतर टिळकनगर पोलिसांनी सामाजिक शांतता भंग केल्याबद्दल शनिवारी गुन्हा दाखल केला. त्यानंतर शनिवारी रात्री पराडकर यांना अटक केली आहे.

हेही वाचा – “हा शाहरुख खानचा चित्रपट आहे म्हणून…” संजय राऊतांचं ‘पठाण’मधील गाण्याच्या वादावर मोठं वक्तव्य

हेही वाचा – मुंबई : कर्करोग रुग्णांना मिळणार घराजवळ आरोग्य सुविधा

पराडकर यांना रविवारी सकाळी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना काही अटी शर्तींसह २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन दिला आहे. मालाड पूर्व परिसरात देखील शुक्रवारी अनेक ठिकाणी छोटा राजनच्या वाढदिवसाचे बॅनर लावण्यात आले होते. त्याप्रकरणीही पोलिसांनी सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2023 at 15:29 IST

संबंधित बातम्या