मुंबई : भाजपच्या निलंबीत नेत्या नुपूर शर्मा यांचे वक्तव्य आणि राजस्थानमध्ये झालेल्या हत्येच्या पार्श्वभूमीवर ट्वीट करून धमकी देणाऱ्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वांद्रे येथून अटक केली. आरोपीविरोधात धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिझवान तौफिक रेहमान शेख (२५) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो वांद्रे पश्चिम येथील रहिवासी आहे. याप्रकरणी पोलीस नाईक शिवप्रसाद पवार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडून मोबाइल संच जप्त करण्यात आला आहे. आरोपी एखाद्या संघटनेशी संबंध आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2022 रोजी प्रकाशित
धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यास मुंबईतून अटक
आरोपीकडून मोबाइल संच जप्त करण्यात आला आहे. आरोपी एखाद्या संघटनेशी संबंध आहे का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 07-07-2022 at 04:53 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man arrested for creating religious rift in mumbai zws