मुंबईः रेल्वेत १५ वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. आरोपीला प्रवाशांनी पकडून मारहाण केल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला रुग्णालयातून सोडल्यावर याप्रकरणी अटक करण्यात येणार आहे. तक्रारदार मुलगी दक्षिण मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत होती.

हेही वाचा >>> अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवारी तिला रुग्णालयातून उपचारानंतर सोडण्यात आल्यानंतर ती वडिलांसह आपल्या घरी जात होती. त्यावेळी शेजारी बसलेल्या आरोपीने तिला असभ्यरित्या स्पर्श केला. त्याचा जाब विचारला असता त्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. त्यानंतर प्रवाशांनी आरोपीला पकडून मारहाण केली. त्यानंतर त्याला अंधेरी स्थानकावर उतरवण्यात आले. आरोपीला मारहाण झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी विनयभंग व पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून रुग्णालयात सोडण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.