नवी मुंबई : पार्किंगवरून एकाला हॉकी स्टीकने मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

इमारतीतील दोघांनी एका व्यक्तीला मारहाण केली आहे

Navi Mumbai crime

वाहन पार्किंगची समस्येचे गांभीर्य दर्शीवणारी एक घटना पनवेल मधील खांदेश्वर येथे घडली आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या अंबिका नगर या सोसायटीमध्ये वाहन पार्किंगवरून सातत्याने वाद निर्माण करणाऱ्या दोघा गाव गुंडांनी त्याच सोसायटी मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली आहे. ही मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली.

या दोन्ही रहिवाशांमध्ये वाहन पार्किंग वरून वारंवार वाद होत होते. मात्र या वादाचे रूपांतर आता तुंबळ हाणामारीत झाले. दोन गाव गुंडांनी हॉकी स्टिकने मारहाण केल्यावर पोलीस ठाणे गाठत आपल्यालाच मारहाण करण्यात आली असल्याची खोटी नोंद केली. मात्र सीसीटीव्ही समोर आल्याने पोलीस देखील हैराण झाले. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या दोन्ही गाव गुंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत. तक्रारदारावर रुग्णालयात उपचार सुरू असून खांदेश्वर पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत, अशी माहिती खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी दिली

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man was hit with a hockey stick from a parking lot in navi mumbai abn

Next Story
स्पर्धा परीक्षेद्वारे करियरची उत्तम संधी!; विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रवींद्र शिसवे यांचे मार्गदर्शन
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी