मुंबई : वाढता ताणतणाव, बदलती जीवनशैली यामुळे माणसाच्या मेंदूवर अनेक विपरित परिणाम होत असतात. त्यातूनच मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांना इजा होण्याची दाट शक्यता असते. यामुळे रक्तवाहिन्यांना फुगा येतो आणि व्यक्तीचा मृत्यू होण्याचा धोका निर्माण होतो. सोलापूरमधील मंगल माने यांच्या मेंदूतील रक्तवाहिनीला अशाच प्रकारे फुगा आला होता. हा फुगा अचानक फुटल्याने त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना तातडीने सोलापूरहून मुंबईमधील नायर रुग्णालयात आणण्यात आले. नायर रुग्णालयात मंगल यांच्यावर वेळीच शस्त्रक्रिया केल्याने त्यांचे प्राण वाचवले.

सोलापूरमधील एमआयडीसी परिसरातमध्ये राहत असलेल्या मंगल माने यांना मागील दीड महिन्यांपासून डोळे दुखण्याचा त्रास होत होता. मात्र एक दिवशी अचानक पहाटे ६ वाजता त्या बेशुद्ध पडल्या. त्यावेळी त्यांच्या तोंडातून फेस आला. त्यांना तातडीने सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याने चक्कर आल्याचे सांगितले आणि उपचार करून घरी पाठवले. मात्र त्यांचे कुटुंबिय दुसऱ्या दिवशी त्यांना वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडे घेऊन गेले. त्यांनी न्यूरोसर्जनला दाखविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मंगल यांना न्यूरोसर्जनकडे नेण्यात आले. त्यांनी मंगल यांचा एमआरआय काढण्यास सांगितले. एमआरआयमध्ये मंगल यांच्या मेंदूतील रक्तवाहिनीला फुगा आल्याचे आणि तो फुटल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मात्र फुगा फुटल्याने त्यांच्या जीवाला धोका असून, त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली होती. मात्र या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता कमी असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

Pune, man theft, theft in Neighbor house,
पुणे : आईच्या शस्त्रक्रियेसाठी शेजाऱ्याचे घर फोडले
dombivli aarogyam hospital
डोंबिवलीतील आरोग्यम रुग्णालयातील डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांना महिला रुग्णाच्या नातेवाईकाचे चावे
heatwave heat, people of mumbai, summer season, Citizens, vomiting, dizziness, diarrhea
उष्णतेमुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; नागरिक उलटी, चक्कर व अतिसाराने हैराण
Rats in operating theaters of V N Desai Hospital
व्ही. एन. देसाई रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहांमध्ये उंदरांचा सुळसुळाट

हेही वाचा >>>मुंबई : शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर महानगरपालिकेची ठाकरे गटाला लेखी परवानगी

संभ्रमावस्थेत असलेल्या मंगलचे पती प्रकाश यांनी तातडीने नायर रुग्णालयात डाॅक्टरकीचे शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलाशी संपर्क साधून त्याला सर्व माहिती दिली. त्यांनी मंगल यांना तातडीने मुंबईला घेऊन येण्यास सांगितले. नायर रुग्णालयात आणल्यानंतर न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. आदिल छागला व त्यांच्या सहकार्यांनी तातडीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांच्या मेंदूतील रक्तवाहिनीतील रक्ताचा प्रवाह सुरळीत केला. सध्या रुग्णाची प्रकृती उत्तम आहे. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेसाठी सहा लाख रुपये खर्च सांगितला होता. मात्र नायर रुग्णालयात ती अवघ्या ३० हजार रुपयांमध्ये झाल्याचे मंगल माने यांचे पती प्रकाश माने यांनी सांगितले.

हेही वाचा >>>मुंबई : दादरमध्ये अनधिकृतपणे फुल विक्री करणाऱ्यांविरुद्ध पालिकेची कारवाई

दोन प्रकारे होते शस्त्रक्रिया

मेंदूतील रक्तवाहिनीला आलेला फुगा काढण्याची दोन प्रकारे शस्त्रक्रिया करता येते. पहिल्या प्रकारात कॉईलिंग पद्धतीने शस्त्रक्रिया केली जाते. यासाठी जवळपास ६ लाख रुपये खर्च येतो. तसेच क्लिपींग पद्धतीनेही यावर शस्त्रक्रिया करण्यात येते. यासाठी तीन लाख रुपये खर्च येतो.

कशामुळे येते मेंदूच्या रक्तवाहिनीला फुगा

अशा प्रकाराचा त्रास पूर्वी ६० ते ६५ वर्ष वयोगटातील नागरिकांना होत असल्याचे निदर्शनास आले होते. मात्र बदलती जीवनशैली, मधुमेह, उच्च रक्तदाब, ताण, तणाव, धूम्रपान, चुकीची आहार पद्धत, फास्टफूड आदींमुळे सध्या हा आजार ४० वर्षे वयोगटातील नागरिकांमध्ये दिसू लागला आहे. मेंदूतील रक्तवाहिनीला आलेला फुगा फुटल्यास संबंधित व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता असते, असे नायर रुग्णालयातील न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. आदिल छागला यांनी सांगितले.