मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील एलबीएस मार्गावरील रंगून ढाबा या हॉटेलमध्ये शनिवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतकी भडकली होती की आगीच्या ज्वाळा दूरूनही दिसत आहेत. उपाहारगृहाच्या खालच्या मजल्यावर ही आग लागली आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा >>> टोरेस घोटाळा प्रकरण : नऊ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुर्ला पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्गावर कल्पना टॉकीजच्या समोर असलेल्या रंगून जायका ढाबा या हॉटेलमध्ये भीषण आग लागली. रात्री सव्वा नऊच्या सुमारास लागलेली ही आग काही वेळातच भडकली असून आगीची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एलबीएस मार्गावरून वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. तसेच या मार्गावर अनेक ढाबे एकमेकांना खेटून आहेत. त्यामुळे घटनेचे गांभीर्य वाढले आहे.  घटनास्थळी पालिका विभाग कार्यालयाचे पथक, अग्निशमन दलाचे पथक, चार फायर इंजिन, तीन पाण्याचे ट्रॅंकर, पोलीस, विद्युत वितरण कंपनीचे पथक जमले आहे. आग विझवण्याचे काम रात्री उशीरपर्यंत सुरु होते. आगीत कोणी जखमी आहे किंवा नाही याबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.