मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या एमबीए – एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने ९ ते ११ मार्च या कालावधीत महाराष्ट्र राज्य आणि अन्य राज्यातील विविध १७८ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. सीईटी सेलतर्फे आतापर्यंत १३ परीक्षा झाल्या असून त्यापैकी १० परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये बीएड, एमएड, बीपीएड, एमपीएड, विधि शाखा (पाच वर्षीय अभ्यासक्रम) आदी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने ९ ते ११ मार्च या कालावधीत महाराष्ट्र राज्य आणि अन्य राज्यातील विविध १७८ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. या सामाईक प्रवेश परीक्षेनंतर सीईटी सेलतर्फे प्रथमच विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या लॉगिनमध्ये आक्षेप नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या सुविधेचा लाभ घेत एकूण ४१५ विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदविले. त्यापैकी एकूण ९९ आक्षेप हे युनिक होते. या सर्व आक्षेपांचे निराकरण केल्यानंतर निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये गुणपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सीईटी सेलतर्फे देण्यात आली. विद्यार्थ्यांना https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत संकेतस्थळावरून निकाल पाहता येईल. याच संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका डाउनलोड करता येईल.

हेही वाचा…परदेशी वैद्यकीय पदवीधरांना आंतरवासिता पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची मुदतवाढ; राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून दिलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमबीए प्रवेश परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सीईटी सेलद्वारे केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया (कॅप) सुरू केली जाईल. या माध्यमातून राज्यातील तीनशेहून अधिक महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहे.