लैंगिक गैरवर्तनाचे आरोप करणाऱ्यांना अनेक कलाकारांचा पाठिंबा

मुंबई : ‘कास्टिंग काऊच’ हा शब्द बॉलीवूडसाठी कधीच नवीन नव्हता; परंतु तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर बॉलीवूडच्या आणखी काही अभिनेत्रीही आपल्या बाबतीतही असेच घडले होते, असे म्हणत आपल्यावरील कथित अत्याचाराबद्दल जाहीरपणे बोलू लागल्या आहेत. त्यांना अनेक अभिनेत्री-अभिनेत्यांनी पाठिंबाही दिला आहे.

Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
Loksatta Lokrang Economist Sanjeev Sanyal Neon Show In this podcast UPSC Exam
विद्यार्थ्यांचा ओढा का?

कंगना राणावत हिने ‘क्वीन’ चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. लेखक चेतन भगत, दिग्दर्शक रजत कपूर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप होऊ लागले आहेत. चूक करणारी व्यक्ती कितीही मोठी असली तरी तिच्यावर ठोस कारवाई व्हायला हवी, असा सूर बॉलीवूडमध्ये उमटत आहे.

तनुश्री दत्ताने दहा वर्षांपूर्वी ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला. त्या वेळी आपण सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनकडे (सिन्टा) तक्रार केली होती, मात्र या संघटनेने त्या वेळी काहीही केले नाही. उलट आपल्यावर हल्ला झाला आणि गाडीची तोडफोडही करण्यात आली, असे तनुश्रीने सांगितले.

तनुश्रीने जे सांगितले ते खोटे आहे, यावर आपण त्या वेळीही पत्रकार परिषद घेऊन बोललो होतो, असे पाटेकर यांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे तनुश्री दहा वर्षे गप्प का बसली, असा प्रश्न काही जणांनी उपस्थित केला आहे, तर दुसरीकडे फरहान अख्तर, शिल्पा शेट्टी, मलाईका अरोरा, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, हंसल मेहता, आयुष्यमान खुराणा यांच्यासह अनेक कलाकारांनी तनुश्रीच्या धाडसाचे कौतुक  केले आहे. या प्रकरणातील सत्य-असत्य बाहेर येईल, मात्र तिला बोलू दिले पाहिजे, अशी भूमिका कलाकारांनी घेतली.

तनुश्रीने याप्रकरणी पाटेकर यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर आता बॉलीवूडमधील अनेक दाबून टाकलेली लैंगिक छळ प्रकरणे उघडकीस येऊलागली आहेत. अनुराग कश्यप, विकास बहल, मधु मंटेना आणि विक्रमादित्य मोटवने यांच्या फँटम प्रॉडक्शनमध्येकाम करणाऱ्या एका महिलेने दिग्दर्शक विकास बहलने आपली लैंगिक छळणूक केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी आपण अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवने यांच्याकडे दाद मागितली होती, मात्र त्यांनी काहीही कारवाई केली नाही, असे तिने स्पष्ट केले. याच कारणावरून फँ टम प्रॉडक्शनबंद करण्यात आल्याचीही चर्चा आहे. कंपनी बंद केल्यानंतर अनुरागने कंपनीच्या नियमानुसार आपण बांधील असल्याने त्या वेळी काही करू शकलो नाही, याबद्दल क्षमा मागत आपल्या कुठल्याही कार्यालयात असे प्रकार घडणार नाहीत, याची ग्वाही दिली आहे. विकासने हे कृत्य केले असेल, असे मत व्यक्त करून कंगनाने आपला अनुभवही जाहीरपणे सांगितला आहे. आणखी एका अभिनेत्रीनेही विकास बहलने जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप केला आहे.

लेखक चेतन भगत यांच्यावरही लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला आहे. चेतन यांनी एका मुलाखतीच्या निमित्ताने आपल्याशी गैरवर्तन केले होते, असा आरोप एका पत्रकार महिलेने केला आहे. अभिनेता-दिग्दर्शक रजत कपूर यांनीही चित्रपटात काम देण्याच्या निमित्ताने आपल्याशी असभ्य वर्तन केले होते, असा आरोप दोन अभिनेत्रींनी केला आहे.

एकीकडे अशी अनेक उदाहरणे समोर येत असताना शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा यांनी आरोप करणाऱ्या महिलांना पाठिंबा दिला आहे.

या चळवळीला ‘मी टू’ नाही तर ‘यू टू’ असा उल्लेख करून स्त्रियांनी त्यांच्यावरील लैंगिक शोषणाविरुद्ध जाहीरपणे आवाज उठवायला हवा. कारण या प्रकरणांमध्ये त्या नाही तर पुरुष दोषी आहेत, असे मत शिल्पा शेट्टीने व्यक्त केले आहे.

सत्य हे सत्यच राहणार..

तनुश्री प्रकरणावर नाना पाटेकर अजूनही गप्प असल्याने अखेर सोमवारी पत्रकारांनी त्यांचे घर गाठले आणि त्यांना बोलते केले. मात्र याप्रकरणी आपल्या वकिलांनी कोणाशीही बोलायला मनाई केली असल्याने आपण पत्रकार परिषदही रद्द केल्याचे नानांनी स्पष्ट केले. पत्रकारांनी खूप विचारणा केल्यानंतर जे सत्य आहे ते सत्यच राहणार, एवढेच सांगत नानांनी विषय संपवला.

तन्मय भट ‘एआयबी’तून बाहेर

मुंबई: लेखक व व्यंगकार उत्सव चक्रवर्ती यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांमुळे त्यांच्याशी संबंध तोडल्यानंतर आणि तक्रारी होऊनही कारवाई न केल्यामुळे  ‘एआयबी’ टीकेचे धनी ठरले आहेत. मुंबईतील एआयबी या ‘कॉमेडी कलेक्टिव्ह’चे संस्थापक सदस्य आणि सीईओ तन्मय भट यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नसल्यामुळे ते ‘पदावरून दूर होत असल्याचे’ एआयबीने सोमवारी जाहीर केले. लैंगिक गैरवर्तनाचा आरोप असलेले एआयबीचे दुसरे संस्थापक सदस्य गुरसिमरन खांबा यांनाही तात्पुरत्या रजेवर जाण्यास सांगण्यात आले आहे.