उपनगरी रेल्वेसह एक्स्प्रेसवरही परिणाम

मुंबई : मध्य रेल्वेच्या सायन ते कुर्ला स्थानकांदरम्यान नवीन पादचारी पुलाच्या कामासाठी २५ जानेवारीच्या मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुलावर गर्डर बसविण्यासाठी वडाळा रोड ते मानखुर्द आणि घाटकोपर ते कुर्ला व माटुंगादरम्यान मध्यरात्री एक ते पहाटे ४.५० पर्यंत सर्वच मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

ब्लॉक काळात सीएसएमटीहून कर्जतला जाणारी मध्यरात्रीची १२.२५ वाजताची लोकल रद्द करण्यात आली आहे. त्याआधी कसारासाठी शेवटची लोकल मध्यरात्री १२.१५ वाजता रवाना होईल. हार्बर मार्गावरून सीएसएमटी-पनवेल (मध्यरात्री १२.२४) लोकलही रद्द केली आहे.

२६ जानेवारीला सीएसएमटीतून सकाळी ७.१० वाजता सुटणारी मांडवी एक्स्प्रेस सकाळी १० वाजता सुटणार आहे, तर बंगळूरु उद्यान एक्स्प्रेस सकाळी ८.०५ च्या ऐवजी सकाळी १०.३० वाजता सुटेल.

दादर स्थानकापर्यंतच .. २६ जानेवारीला  भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेस, मंगळुरू-मुंबई एक्सप्रेस, अमरावती -मुंबई एक्सप्रेस दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत. दरम्यान, मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून २६ जानेवारीला मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.

मुख्य मार्गावरील रद्द फेऱ्या

ठाणे ते सीएसएमटी- १२.२३ वा. (२५ जानेवारी म.रा.)

’ सीएसएमटी ते कर्जत- ४.४८ वा. (२६ जानेवारी पहाटे)

’ ठाणे ते सीएसएमटी- ४.५६ वा (२६ जानेवारी पहाटे)

हार्बरवरील रद्द फेऱ्या

’ सीएसएमटी ते पनवेल- ४.५२ वा. (२६ जानेवारी पहाटे)

पनवेल ते सीएसएमटी- ४.२९ वा. (२६ जानेवारी पहाटे)

रद्द पॅसेंजर, एक्स्प्रेस गाडय़ा

’ ५११५४ भुसावळ ते सीएसएमटी पॅसेंजर (२५ जानेवारी)

’ ५११५३ सीएसएमटी ते भुसावळ पॅसेंजर (२६ जानेवारी)

’ ५१०३४ साईनगर शिर्डी ते सीएसएमटी एक्स्प्रेस (२६ जानेवारी)

’ ५१०३३ सीएसएमटी ते साईनगर शिर्डी (२६ जानेवारी)