‘स्थानिक संस्था कर’ (एलबीटी) कायद्यामध्ये दुरुस्त्या कराव्यात आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळामध्ये केलेल्या निवेदनासंदर्भात त्वरित अध्यादेश काढावा या मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी सोमवारपासून दोन दिवसांचा राज्यव्यापी बंद पुकारला आहे. ठाणे, नवी मुंबई, वसईतील व्यापारीही बंदमध्ये सहभागी होणार आहेत. या बंदमध्ये रेशन दुकानदारांपासून स्थानिक विक्रेतेही सहभागी होणार असल्याची माहिती फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष मोहन गुरनानी यांनी दिली.