मुंबईतील रेल्वेसेवेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मध्य रेल्वेवर सतत तांत्रिक बिघाडाच्या घटना समोर येत असतानाच आता मेट्रोचेही रडगाणे सुरु झाले आहे. आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे मेट्रोसेवा उशिराने चालत होती.
तांत्रिक कारणांमुळे वर्सोवा व घाटकोपरकडे जाणारी वाहतूक १५ ते २० मिनीटे उशीराने सुरु होती. तसेच, या स्थानकांवरील इंडिकेटर्सही बंद पडल्याने प्रवाशांचा आणखीनच पारा चढला. मुंबई लोकलच्या रडगाण्याचा कित्ता गिरवत आता मुंबई मेट्रोनेही मुंबईकरांची पुरती निराशा करण्यास सुरूवात केल्याचे चित्र आता दिसू लागले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Mar 2015 रोजी प्रकाशित
तांत्रिक बिघाडामुळे मेट्रोसेवेचा खोळंबा
मध्य रेल्वेवर सतत तांत्रिक बिघाडाच्या घटना समोर येत असतानाच आता मेट्रोचेही रडगाणे सुरु झाले

First published on: 30-03-2015 at 09:27 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro train delay due to technical failure