महाराष्ट्र गृहनिर्माण विकास प्राधिकरणाने (म्हाडा) मान्सूनपूर्व जुन्या इमारतींचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात म्हाडाने दक्षिण मुंबईतील २१ उपकर प्राप्त इमारती राहण्यास योग्य नसल्याचे सांगितले. तसेच म्हाडाने २१ इमारती अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. या इमारतींमध्ये एकूण ४६० कुटुंबे वास्तव्यास आहेत, तर २५७ नागरिक या इमारतीचा व्यावसायिक उद्देशाने वापर करतात, अशी माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईत १४ हजार ७५५ उपकर प्राप्त इमारती जुन्या आणि जीर्ण अवस्थेत आहेत. या इमारतींचे दरवर्षी सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार या सर्वेक्षणात २१ इमारती अतिधोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. येथे राहत असलेल्या रहिवाशांची जीवित तथा वित्तहानी टाळण्यासाठी याठीकाणी आपत्ती निवारण यंत्रणा कार्यरत असेल.

हेही वाचा – Mumbai Rains: सेंट्रल आणि हार्बर लाईनवरच्या या लोकल रद्द, बेस्टचेही मार्ग वळवले!

या अतिधोकादायक इमारतींमध्ये एकूण ७१७ लोकं राहतात. यापैकी १९३ जणांनी त्यांची स्वतःची पर्यायी व्यवस्था केली आहे. तर आतापर्यंत २० जणांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच उर्वरित २४७ रहिवाशी आणि भाडेकरूंना सुचाना देऊन इमारत खाली करने सुरु आहे.

ह्या इमारती आहेत अतिधोकादायक

म्हाडाने, इमारत क्रमांक १४४ एमजी रोड अ -११६३, १०१-१११ बारा इमाम रोड, ७४ निजाम स्ट्रीट, १२3 किका स्ट्रीट, १६६ डी मुंबा देवी, २-४ अ भोईवाडा लेन, ४२ मशिद स्ट्रीट, १४ भंडारी स्ट्रीट मुंबई, ६४-६४ अ भंडारी स्ट्रीट मुंबई, इमारत क्रमांक १-३-५, संत सेना महाराज, ३ सोनापूर २ री क्रॉस लेन, इमारत २-४ सोरबजी संतुक लेन, ३८७-३९१ बदामवाडी व्ही.पी. रोड, २७३-२८१ फाल्कलँड रोड, इमारत क्रमांक १ खेतवाडी १२ गली, ३१ सी आणि अ ३३ गिरगाव, १०४-१०६ मेगजी बिल्डिंग, इमारत क्रमांक १५-१६ केके मार्ग आणि इतर इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada announces list of 21 most dangerous buildings in mumbai srk
First published on: 09-06-2021 at 14:31 IST