मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांसाठी आज दुपारी दोन वाजता नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सोडत काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोडतीचा शुभारंभ केला जाणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडणाऱ्या या सोडत सोहळ्याला अर्जदारांना उपस्थिती राहता येणार आहे.

प्रथम प्राधान्य नियमाने अर्जदारांना सभागृहात प्रवेश दिला जाणार आहे. तर जे सोहळ्यास उपस्थित राहू शकत नाहीत त्यांना वेबकास्टिंगद्वारे https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावरील https://www.youtube.com/live/UsZDZUL3YyA?feature=share या लिंकवरून थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे, निकाल जाणून घेता येणार आहे. तर याच संकेतस्थळावर आजच सायंकाळी ६ वाजता विजेत्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरुवारपासून अनामत रक्कमेचा परतावा

एक लाख २० हजार १४४ पैकी केवळ ४०८२ अर्जदार या सोडतीत विजेते ठरणार आहेत. तर एक लाख २० हजार १६ हजार ६२ अर्जदार अयशस्वी ठरणार आहेत. या अयशस्वी अर्जदारांना गुरुवारपासुन (१७ ऑगस्ट) अनामत रकमेचा परतावा केला जाणार असल्याचे मुंबई मंडळाने जाहिर केले आहे. या एक लाख २० हजार १४४ अर्जदारांनी एक ते अडीच महिन्यांपासून अनामत रक्कम भरली आहे. अगदी १० हजार रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंतची हि रक्कम आहे. अनेकांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरले आहेत. त्यामुळे अनेकांची मोठी रक्कम म्हाडाकडे अडकून आहे. तेव्हा अयशस्वी ठरल्यास आपली रक्कम कधी परत होणार असा प्रश्न पडलेल्यांना मंडळाने दिलासा दिला आहे.