लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४,०८२ घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्याची आज (सोमवार) शेवटची मुदत आहे. अर्ज भरण्याची आणि ऑनलाइन पद्धतीने अनामत रक्कम भरण्याची मुदत सोमवारी रात्री ११.५९ वाजता संपणार आहे. त्यामुळे सोडतीत सहभागी होऊन हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्यांनी तातडीने अर्ज भरण्याची गरज आहे. दरम्यान, आतापर्यंत अनामत रक्कमेसह दाखल झालेल्या अर्जांची संख्या एक लाखापार गेली आहे. आतापर्यंत (समोवार, सकाळी ११ वाजेपर्यंत) १ लाख ३ हजार अर्ज अनामत रक्कमेसह दाखल झाले आहेत.

मुंबईतील ४,०८२ घरांसाठी २२ मेपासून अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे. काही कारणाने या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली असून सोमवार, १० जुलै रोजी रात्री ११.५९ वाजता अर्ज भरण्याची आणि ऑनलाईन पद्धतीने अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्याची मुदत संपणार आहे. तर आरटीजीएस-एनईएफटीसह अनामत रक्कम भरून अर्ज दाखल करण्याची मुदत बुधवारी संपणार आहे. बॅंकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत ही मुदत असणार आहे. अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जांची छाननी होईल आणि त्यानंतर अर्जांची प्रारूप यादी आणि पुढे सोडतीत सहभागी होणाऱ्या अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आठवड्याभरात सोडत काढण्यात येते. पण यावेळी सोडतीची तारीख निश्चित झालेली नाही. परिणामी, सोडत कधी निघणार याची अर्जदारांना प्रतीक्षा आहे. सोडतीची तारीख जाहीर होत नसल्याने अर्जदारांमध्ये नाराजी आहे. तर मुंबई मंडळाने लवकरात लवकर सोडतीची तारीख जाहीर करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

आणखी वाचा-ऑनलाईन समोसे महागात पडले, डॉक्टरांच्या बँक खात्यातून दीड लाख रुपये काढले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अर्ज भरण्याची आणि ऑनलाईन पद्धतीने अनामत रक्कमेसह अर्ज सादर करण्याची मुदत संपण्यास काही तास असताना सोडतीसाठी एक लाख ३१ हजार अर्ज आले आहेत. तर अनामत रक्कमेसह एक लाख ३ हजार अर्ज दाखल झाले आहेत.