मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाची सहा हजार ५८ घरांच्या लांबणीवर पडलेल्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. या घरांची सोडत सोमवार, २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार असून, या सोडतीत ५८ हजार अर्जदार सहभागी होणार आहेत.

पुणे मंडळाच्या सोडतीसाठीची सोडतपूर्व प्रक्रिया जानेवारीपासून सुरू होती. त्यानुसार ७ मार्च रोजी सोडत जाहीर होणार होती. मात्र अचानक ही सोडत पुढे ढकलण्यात आली. उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोडत काढण्याचा अट्टाहास पुणे मंडळाचा होता. मात्र सोडतीसाठी फडणवीस यांची वेळ न मिळाल्याने पुणे मंडळाने अचानक सोडतच पुढे ढकलली. यासाठी मंडळाने कोणतेही कारण दिले नाही आणि अर्जदारांची सोडतीची प्रतीक्षा लांबली. आता अखेर फडणवीस यांची वेळ मिळाली असून मंडळाने सोडतीसाठी सोमवारचा मुहूर्त धरला आहे.

bmc, mumbai municipal corporation, Tree Lights, Citing Environmental Concerns, tree lights in mumbai, mumbai tree lights, bmc Orders Removal of Tree Lights, mumbai news, environment news, dangerous for insects, bmc news, marathi news,
झाडांवरील रोषणाई सात दिवसात हटवा, पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयाना आदेश
Traffic changes in Divisional Commissioner office area due to show of force by candidates Pune news
उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतूक बदल… काय आहेत बदल?
BJPs Ghar Chalo Abhiyan Determined to reach twelve lakh voters in Pune
भाजपचे ‘घर चलो अभियान’! पुण्यातील बारा लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर

हेही वाचा – “आमच्या प्रिय देवेंद्रजींकडून हे अपेक्षित नाही”, राऊतांचं टीकास्र; अमृता फडणवीसांना धमकी प्रकरणावरूनही केलं लक्ष्य!

हेही वाचा – “महाराष्ट्रात मुख्यमंत्री नव्हे, मख्खमंत्री आहेत”, संजय राऊतांची खोचक टीका; म्हणाले, “ते फक्त ४० आमदारांना…!”

फडवणीस आपल्या दालनातून सोमवारी सकाळी ११ वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सोडतीला सुरुवात करणार आहेत. ही सोडत पुणे मंडळाच्या आगरकर नगर येथील गृहनिर्माण भवनात पार पडणार आहे.